Land Acquisition Agrowon
ॲग्रो विशेष

Land Acquisition : ‘एमआयडीसी’साठी एकरी २५ ते ३५ लाखांचा मावेजा

Tamlawadi MIDC : तामलवाडी औद्योगिक क्षेत्रात चार स्वतंत्र क्लस्टर उभारण्याचा निर्णय झाला आहे. त्यानुसार टेक्स्टाइल, अ‍ॅग्रो प्रोसेसिंग, अनुसूचित जाती-जमातींसाठी आणि महिला उद्योजकांसाठी हे क्लस्टर उभारण्यात येणार आहेत.

Team Agrowon

Dharashiv News : तामलवाडी (ता. तुळजापूर) येथे औद्योगिक क्षेत्रासाठी (एमआयडीसी) संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीच्या मोबदल्यात शेतकऱ्यांना समाधानकारक मावेजा मिळावा, यासाठी महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्स्फॉर्मेशनचे (मित्र) उपाध्यक्ष आमदार राणाजगजितसिंह पाटील पाठपुरावा करत आहेत.

यातूनच जमिनीला साधारणपणे २५ ते ३५ लाख रुपये प्रति एकरी मावेजा मिळेल, असा प्राथमिक अंदाज आहे. जमिनी व्यतिरिक्त अन्य आनुषंगिक बाबींचा मोबदला स्वतंत्र असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले

तामलवाडी औद्योगिक क्षेत्रात चार स्वतंत्र क्लस्टर उभारण्याचा निर्णय झाला आहे. त्यानुसार टेक्स्टाइल, अ‍ॅग्रो प्रोसेसिंग, अनुसूचित जाती-जमातींसाठी आणि महिला उद्योजकांसाठी हे क्लस्टर उभारण्यात येणार आहेत. या क्लस्टरमध्ये धाराशिव जिल्ह्यातील स्थानिक व नवोदित उद्योजकांना विशेष प्राधान्य दिले जाणार आहे.

एमआयडीसीच्या जमिनीसंदर्भात स्थानिक शेतकरी आणि जमीन मालकांशी सलग दोन वेळा बैठक घेऊन त्यांच्यासमवेत थेट संवाद साधला आहे. शेतकरी बांधवांनी जमिनीच्या मोबदल्याबाबत त्यांची अपेक्षा स्पष्ट केली होती तसेच काही शंकादेखील मांडल्या.

शंका आणि महत्त्वाच्या सूचना ध्यानात घेऊन जिल्हा प्रशासनाकडून प्राथमिक नजर अंदाज तयार करण्यात आला आहे. त्याप्रमाणे एकरी २५ ते ३५ लाख रुपयांपर्यंत मोबदला मिळण्याची शक्यता आहे. या मोबदल्यात आणखी वाढ होण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.

जमिनीचा मावेजा दिल्यानंतरही तामलवाडी औद्योगिक क्षेत्रात शेतकऱ्यांसाठी संधी उपलब्ध करून दिल्या जातील. एमआयडीसीच्या धोरणानुसार शेतकऱ्यांसाठी दहा टक्के औद्योगिक भूखंड राखीव ठेवले जातात. शासकीय दराने उद्योग उभारणी करण्यासाठी इच्छुक असलेल्या प्रकल्पग्रस्तांसाठी ते दिले जातात.

उद्योगांमध्ये स्थानिकांना रोजगाराच्या दृष्टीनेही प्राधान्य आहे. बाधित कुटुंबातील किमान एका व्यक्तीस स्वयंरोजगाराच्या संधी मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगत मावेजा हा जमिनीचा मावेजा असणार आहे. त्याव्यतिरिक्त शेड, झाडे, विहीर, बोरवेल आदींचे मूल्यांकन वेगळे असणार असून त्याचा वेगळा मावेजा मिळणार असल्याचे आमदार पाटील यांनी स्पष्ट केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Protest: आंबा, काजू उत्पादकांचा मोर्चा मुंबईत रोखला, राजू शेट्टी, महादेव जानकरांची पोलिसांकडून धरपकड

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार; कापूस टिकून, मक्याचा भाव दबावातच, बाजरी आवकेचा दबाव, तूर स्थिरावली

Illegal Water Lifting: अवैध पाणी उपसा; तलावांवरील मोटारी हटविण्याचे आदेश

Lower Terna Project: निम्न तेरणा प्रकल्पाचा कारभार वाऱ्यावर

Land Acquisition: शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचा निधी तातडीने द्या : मंत्री प्रकाश आबिटकर

SCROLL FOR NEXT