Milk Subsidy agrowon
ॲग्रो विशेष

Milk Subsidy : शेतकऱ्यांचा गाईंसह जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा; दूध अनुदानावरून शेतकरी संघटना आक्रमक

Milk Rate : दुधाला २७ रुपये इतका कमी दर दिल्यामुळे दूध उत्पादक तोट्यात आलेले आहेत. याचा निषेध म्हणून आम्ही आंदोलन करीत आहोत. अशी माहिती माणिक शिंदे यांनी दिली.

sandeep Shirguppe

Milk Subsidy Rate : गाईच्या दुधाला चाळीस रुपये प्रतिलिटर दर मिळावा तसेच सात महिन्याचे थकीत दूध अनुदान ताबडतोब शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावे. यासह अन्य मागण्यांसाठी रघुनाथ दादा प्रणीत शेतकरी संघटनेच्यावतीने गुरूवार (ता.३०) कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांनी गाईसह मोर्चा काढला. दसरा चौक येथे गाईचे पूजन करून मोर्चाला सुरुवात झाली. यावेळी शेतकऱ्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

शेतकरी संघटनेचे नेते माणिक शिंदे म्हणाले की, "सरकारने घोषित केलेले सात महिन्याचे थकीत अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्याप जमा करण्यात आले नाही. दुधाला २७ रुपये इतका कमी दर दिल्यामुळे दूध उत्पादक तोट्यात आलेले आहेत. याचा निषेध म्हणून आम्ही आंदोलन करीत आहोत. अशी माहिती शिंदे यांनी दिली.

"सरकारने गाईंच्या दुधाला ४० रुपये दर व ७ महिन्यापासून थकीत अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी दुधाची आंघोळ करतील. मंत्र्यांच्या वाहनांवर दुधाच्या बाटल्या फेकून निषेध व्यक्त करण्यात येईल. असा शिंदे यांनी इशारा दिला.

"गाईच्या दुधाला अनुदान देण्याचा निर्णय झाला. मात्र, राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होऊनही याबाबतीत अजून निर्णय झालेला नाही. गत वर्षातील जून ते सप्टेंबर महिन्यातील १८० कोटी तर, ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्याचे ५५० कोटी असे एकूण ७३० कोटींच्या निधीला मंजुरी दिली. मात्र, राज्य सरकारच्या तिजोरीत ठणठणात असल्याने गाय दूध उत्पादकांना दुधावरील अनुदानाची रक्कम मिळालेली नाही". अशी टीका शिंदे यांनी केली.

शेतकरी संघटना उपाध्यक्ष ज्योतीराम घोडके म्हणाले की, "जर दूध उत्पादकांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा व उपोषणाचा इशारा दिला". यावेळी अनिल जाधव, जयश्री सरीकर, मच्छिंद्र पाटील, सतीश चव्हाण, प्रदीप अस्वले, बाबासो सूर्यवंशी, अनिता सुतार इत्यादी दूध उत्पादक शेतकरी यावेळी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan: शेतकऱ्यानं जीवन संपवल्यास बँका जबाबदार- महसूलमंत्री बावनकुळे

Sita Herbal Farm: अल्पभूधारक महिलांच्या ‘सीता हर्बल फार्म’ची वनौषधी उद्योगापर्यंत झेप

Crop Insurance Compensation: शेतकऱ्यांचे डोळे पीक विमा भरपाईकडे

Agricultural Cost Inflation: येत्या वर्षातही वाढणार शेतीवरील खर्च, खाद्य महागाई

Horoscope 5 October 2026 : कठीण परिस्थितीचा धैर्याने सामना कराल

SCROLL FOR NEXT