Flower farming Agrowon
ॲग्रो विशेष

Flower Farming : शेतकऱ्यांनो, फळांप्रमाणे फुलशेतीही गरजेची

Fruit Orchard : फळशेतीसोबत शेतकऱ्यांनी फुलशेतीकडेही वळणे गरजेचे आहे. बाजारात मोगरा आणि सोनचाफ्याच्या फुलांना मागणी वाढत आहे. दरही चांगले मिळत आहे.

Team Agrowon

Dombavali News : फळशेतीसोबत शेतकऱ्यांनी फुलशेतीकडेही वळणे गरजेचे आहे. बाजारात मोगरा आणि सोनचाफ्याच्या फुलांना मागणी वाढत आहे. दरही चांगले मिळत आहे.

सरकारकडून अनुदान मिळत असल्याने शेतकऱ्यांनी फळबागांसोबत फुलशेतीकडे वळल्यास शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा होईल, असे मत जिल्हा कृषी अधीक्षक दीपक कुटे यांनी व्यक्त केले आहे. मांगरूळ येथे आयोजित ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमात ते बोलत होते.

राज्य सरकारच्या ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाअंतर्गत खरीप हंगामपूर्व प्रशिक्षण शिबिर अंबरनाथ तालुक्यातील मांगरूळमध्ये आयोजित केले होते. या वेळी शेतकऱ्यांना मोफत भाताचे आणि फळ भाज्यांच्या बियाण्यांचे मिनी किट वितरित करण्यात आले.

ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेतकऱ्यांकडून फळबागांची सर्वाधिक लागवड केली जाते. यामध्ये प्रामुख्याने आंबा, काजू, चिकू, पेरू यांसह अन्य फळांची लक्षणीय लागवड केली जाते. मात्र, फळशेतीसोबत शेतकऱ्यांनी फुलशेतीचा प्रयोग केल्यास याचा अधिक नफा होणार असल्याचे कुटे यांनी सांगितले.

बाजारात सोनचाफ्याच्या एका फुलाची किंमत ही आठ ते दहा रुपयांच्या घरात असते. तर मोगऱ्याच्या फुलांची किंमत प्रति किलो १०० ते १५० रुपयांच्या घरात असते. सणासुदीच्या कालखंडात या फुलांची मागणी वाढलेली असते.

त्यामुळे शेतकऱ्यांनी फुलशेतीकडे वळायला हवे, असे आवाहन दीपक कुटे यांनी केले. याप्रसंगी आमदार गणपत गायकवाड यांनीही मार्गदर्शन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Girna River : गिरणा परिसरातील सर्वच बंधारे तुडुंब

Wildlife Crop Damage : पिकांचे जंगली प्राण्यांपासून संरक्षणासाठी शासन सकारात्मक

MahaDBT : ‘महाडीबीटी’ पोर्टलवर कागदपत्रे अपलोडसह अनेक अडचणी

Book Review: ध्यासपंथी वाटचालींचा कोलाज

Rural Development: शेतकरी, ग्रामीण विकास आणि पर्यावरणाचा एकत्र विचार व्हावा

SCROLL FOR NEXT