Onion Seed Productijon Agrown
ॲग्रो विशेष

Onion Seed Production : सुधारित पद्धतीने कांदा बीजोत्पादनाकडे नाशिकमध्ये कल

Onion Cultivation : शेतकरी सुधारित पद्धतींचा अभ्यास करून कांदा बीजोत्पादनाकडे लक्ष दिल्याचे प्रामुख्याने सटाणा, कळवण, देवळा, दिंडोरी, चांदवड, येवला व निफाड तालुक्यात प्रयोग पाहायला मिळत आहेत.

मुकूंद पिंगळे

Nashik News : राज्यात वऱ्हाड, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात व्यावसायिक पद्धतीने कांदा बीजोत्पादन घेतले जाते. मात्र गेल्या काही वर्षांत बियाण्यांची वाढती मागणी लक्षात घेऊन नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून सुधारित पद्धतीने कांदा बीजोत्पादन घेतले जात आहे. काही ठिकाणी घरगुती तर काही ठिकाणी व्यवसायिक पद्धतीने बियाणे विक्री करण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे.

पारंपरिक पद्धतींचा अवलंब व शास्त्रीय ज्ञानाचा अभावामुळे गुणवत्तापूर्ण कांदा बियाणे उत्पादनात मर्यादा होत्या. शेतकरी सुधारित पद्धतींचा अभ्यास करून कांदा बीजोत्पादनाकडे लक्ष दिल्याचे प्रामुख्याने सटाणा, कळवण, देवळा, दिंडोरी, चांदवड, येवला व निफाड तालुक्यात प्रयोग पाहायला मिळत आहेत.

यंदा समाधानकारक पाऊस असल्याने लागवडी वाढल्याचे चित्र आहे. मात्र यापूर्वी मान्सूनोत्तर पावसामुळे रब्बी कांदा रोपवाटिका बाधित झाल्या. परिणामी दुबार कांदा रोपे तयार करावी लागली.

त्यामुळे बियाणे टंचाई निर्माण झाल्याने चढ्या दराने बियाणे विक्री झाली.परिणामी ही अडचण लक्षात घेऊन बियाणे स्वयंपूर्णतेसाठी विभागात शेतकरी, शेतकरी गट,शेतकरी उत्पादक कंपन्या पुढे येत आहेत.

मार्केटिंग, पॅकिंग व ब्रॅण्डिंग करून विक्री

कांदा बीजोत्पादनात शास्त्रीय पद्धतीने कामकाज होताना कंद निवड, विलगीकरण, परागीभवन यासह सिंचन पद्धती हा महत्त्वाचा मुद्दा शेतकरी विचारात घेत आहेत. त्यानुसार बियाणे उत्पादन घेतल्यानंतर उगवणक्षमता तपासून स्वतः वापर व खात्रीशीर बियाणे म्हणून विक्री करत आहेत. तर शेतकरी उत्पादन कंपन्या स्वतः मार्केटिंग, पॅकिंग व ब्रॅण्डिंग करून विक्री करत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

Government Assistance: शेतकरी आत्महत्येची आठ प्रकरणे मदतीसाठी पात्र

Marathwada Rain Deficit: मराठवाड्यात पावसाच्या तुटीमुळे पेरणी क्षेत्रात ७ टक्क्यांची घट

Buldhana DCC Bank: बुलडाणा जिल्हा बँकेवर सहकार पॅनेलचे वर्चस्व

Maharashtra Rain Alert: राज्यात १० जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट; दोन दिवस पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT