Onion Cultivation  Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Cultivation : घाटनांद्रामध्ये कांदा लागवडीला शेतकऱ्यांची पसंती

Onion Production ; परिसरात दरवर्षी पेक्षा या वर्षी कांद्याच्या क्षेत्रफळात मोठी वाढ झाली आहे. घाटनांद्रासह परिसरात ४० ते ५० हेक्टरवर कांदा लागवड करण्यात आली आहे.

Team Agrowon

Chh. Sambhajinagar News : परिसरात दरवर्षी पेक्षा या वर्षी कांद्याच्या क्षेत्रफळात मोठी वाढ झाली आहे. घाटनांद्रासह परिसरात ४० ते ५० हेक्टरवर कांदा लागवड करण्यात आली आहे. सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रासह परिसरातील शेतकरी दरवर्षी पाण्याअभावी खरीप हा एकमेव हंगाम घेत होते. मात्र यावर्षी पाऊस बऱ्यापैकी झाल्याने विहीरींसह जमिनीतील जलस्रोत चांगलाच वाढलेला आहे.

त्यामुळे खरिपातील हंगामापेक्षा रब्बी हंगामातील क्षेत्रात मोठी वाढ होत आहे. गहू, हरभरा या पारंपरिक पिकांबरोबरच आपल्या उत्पन्नात अधिक वाढ व्हावी यासाठी शेतकरी यंदा गावरान कांदा, तसेच बिजवाईचा कांदा या लागवडीकडे वळले आहेत. बाजारपेठेत कांद्याला भावही चांगला राहत असल्याने आपल्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी शेतकऱ्यांनी यावर्षी गावरान व बिजवाईच्या कांद्याला पसंती दिली आहे.

लागवड केलेले काद्यांचे पीक सध्या चांगलेच बहरात आले आहे. अमोल चौधरी, कारभारी मोरे, गणेश मालोदे, उमेश सोनवणे, तुकाराम ढोके, मुष्ताक देशमुख, सांडू मोरे, संजय अंभोरे, विष्णू मोरे या शेतकऱ्यांनी आपल्या शेत जमिनीमध्ये एकरी पंधराशे ते दोन हजार रुपये प्रतिक्विंटल याप्रमाणे कांदा खरेदी करून त्याची लागवड आपल्या केली आहे.

खरिपातील कांद्याने दगा दिला तर कपाशी, मका, सोयाबिन या पिकांचेही पावसामुळे मोठे नुकसान झाले. खरिपातील कसर रब्बीत भरून काढण्यासाठी शेतकरी यंदा कांदा लागवडीकडे सरसावले आहेत.

सध्या सर्वत्र कांद्याचे पीक बहरले असून बीज धारण झाली आहे. मात्र, पोलन होण्यासाठी गोंड्यांवर मधमाशीच नसल्याने बीज उत्पादन घटणार आहे. त्यामुळे यावर्षी कांदा बिजवाईला यावर्षी चांगला भाव राहील, अशी शक्यता आहे.
- विष्णु मोरे, कांदा व्यापारी, घाटनांद्रा.
कपाशी पिकाला चांगला भाव मिळाला नाही. तसेच एकदोन वेचणितच कपाशीच्या पऱ्हाट्या झाल्या. त्यामुळे कपाशीवर केलेला खर्चदेखील निघाला नाही. म्हणून झालेले नुकसान भरून काढण्यासाठी यावर्षी कांदा पीक घेतले आहे. या पिकाला यावर्षी चांगला भाव मिळावा, अशी अपेक्षा आहे.
- शंकर मोरे, शेतकरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Fertiliser Linking : उत्तर प्रदेशच्या धर्तीवर खत लिकिंगसाठी महाराष्ट्रात नवा नियम आणणार; कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंची विधानसभेत माहिती

Crop Advisory: कृषी सल्ला : कोकण विभाग

Blight Disease: बदलत्या वातावरणात करपा रोगाची शक्यता

Raju Chaudhari Success Story: कडा ते कॅनडा

Nilesh Rane: कोकणातील आंबा, काजू बागायतदारांच्या मदत प्रश्नी निलेश राणेंनी कृषीमंत्र्यांना घेरले

SCROLL FOR NEXT