Farmer Hunger Strike Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Hunger Strike : रोहित्रासाठी शेतकऱ्यांचे उपोषण

Demand on Agriculture Electricity : शेतीपंपासाठी शासन निर्णयाप्रमाणे वीजपुरवठा द्या, दिवसा किमान आठ तास, रात्री दहा तास वीजपुरवठा सुरळीत द्या. या प्रमुख मागण्या घेऊन शेतकरी महावितरणच्या वाळूज उपविभाग कार्यालयासमोर उपोषणास बसले होते.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar News : जवळपास २२ दिवसांपासून नादुरुस्त असलेली रोहित्र व विजेच्या लपंडावाने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केले होते. त्यानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी वीजपुरवठा सुरळीत करण्याचे लेखी दिल्याने शेतकऱ्यांनी उपोषण मागे घेतले.

माहितीनुसार, जवळपास २२ दिवसांपासून नादुरुस्त होते. इतर भागांतूनही होत असलेला वीजपुरवठा वारंवार खंडित होतो. याप्रकरणी महावितरणकडे तक्रार करूनही उपयोग होत नसल्याच्या पार्श्‍वभूमीवर वाळूज परिसरातील शेतकरी गुरुवारी (ता. ८) सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास उपोषणास बसले होते.

शेतीपंपासाठी शासन निर्णयाप्रमाणे वीजपुरवठा द्या, दिवसा किमान आठ तास, रात्री दहा तास वीजपुरवठा सुरळीत द्या. या प्रमुख मागण्या घेऊन शेतकरी महावितरणच्या वाळूज उपविभाग कार्यालयासमोर उपोषणास बसले होते. दुपारी दीड वाजताच्या महावितरणचे उपकार्यकारी अभियंता विजय भिवसाने यांनी शेतकऱ्यांना वीजपुरवठा शुक्रवार (ता. ९) पासून सुरळीत करण्याचे लेखी आश्‍वासन दिल्याने शेतकऱ्यांनी आपले उपोषण मागे घेतल्याची माहिती उपोषणकर्ते शेतकरी श्रीरंग अरगडे यांनी दिली.

यासंदर्भात शेतकऱ्यांनी आधीच महावितरणला निवेदन दिले होते. त्यानुसार शेतकऱ्यांना कुठलीही पूर्वसूचना न देता शेतकऱ्यांचा वीजपुरवठा अचानक खंडित केला जात असल्याची बाब अधोरेखित केली होती. खरीप हातचा गेला असल्याने रब्बी हंगामांकडून आशा आहेत, परंतु पीक जोमात असतानाच विजेचा लपंडाव सुरू असल्याने शेतकरी संकटात सापडला असल्याची बाब महावितरणला दिलेल्या निवेदनातून शेतकऱ्यांनी निदर्शनास आणून दिली होती.

या वेळी रूपचंद कसुरे, सुनील गंगवाल, संतोष बोहरा, सुभाष गव्हाणे, शेरू अरगडे, सर्जेराव भोंड, नंदू सोनवणे, सचिन सुरासे, सतीश घुनावत, बबन उचित, सचिन घुनावत, नवनाथ करडे, रखमाजी आरगडे, अशोक काकडे आदी उपस्थित होते

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Digital Agriculture Policy: डिजिटल सुसूत्रीकरणाचे स्वागतच!

Drought Relief: आंबेगावातील बाधित शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार : दिलीप वळसे पाटील

Chana Variety: परभणी चना-१७ वाणाची पूर्व मध्य विभागासाठी शिफारस

Onion Market Update: खरीप लाल कांद्याच्या आवकेत ७५ टक्के घट

Agricoss Day: डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त २७ डिसेंबरला राज्य अॅग्रीकॉस दिन

SCROLL FOR NEXT