Agri Expo 2025 Agrowon
ॲग्रो विशेष

Agri Expor 2025 : वन्यप्राण्यांचा त्रास, कृषी निविष्ठांचा प्रश्‍न गंभीर

Agrowon Agri Exhibition : प्रदर्शनाला भेट दिलेल्या शेतकऱ्यांनी प्रदर्शन पाहतानाच, शेती समोरील अनेक समस्या ‘अॅग्रोवन’सोबत संवाद साधताना मांडल्या.

Team Agrowon

Chh. Sambhajinagar News : ‘सकाळ-ॲग्रोवन’च्या ‘अॅग्री एक्स्पो-२५’ कृषी प्रदर्शनात रविवारी (ता.१२) सलग तिसऱ्या दिवशी शेतकऱ्यांनी गर्दी केली. प्रदर्शनाला भेट दिलेल्या शेतकऱ्यांनी प्रदर्शन पाहतानाच, शेती समोरील अनेक समस्या ‘अॅग्रोवन’सोबत संवाद साधताना मांडल्या. यामध्ये शेतमजुरांच्या समस्या, वन्य प्राण्यांमुळे होणारे शेतीचे नुकसान, खते-बियाण्याच्या वाढलेल्या किमती या प्रामुख्याने समस्या आहेत.

वन्यप्राण्यांचा वाढता त्रास

माझ्याकडे २५ एकर जमीन असून कापूस हे मुख्य पीक आहे. मजूरटंचाईची वाढती समस्या आहे. यामुळे शेती करणे अवघड झाले आहे. यासोबतच नीलगाय, वानर, रानडुकरांचा त्रास वाढला आहे. शेतीमालास योग्य भाव मिळत नाहीत. शेतकऱ्यांना परवडतील असे खते, बियाण्यांचे दर असावेत.

-रेखा पाटील, जरंडी, ता. सोयगाव, जि. छत्रपती संभाजीनगर

व्यवस्थापन खर्चात वाढ

वातावरण बदलामुळे भाजीपाला पिकांवर कीड, रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. भाजीपाल्याचे दर पडून नुकसान होत आहे. शेडनेट, पॉलिहाउस तंत्रज्ञान वापरासाठी शासनाने शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे.

-अहमद शेख, कचनेर, ता.जि. छत्रपती संभाजीनगर

ऊस उत्पादक अडचणीत

उसावर लोकरी माव्याचा प्रादुर्भाव वाढत आहे. परिणामी, उत्पादनात मोठी घट येत आहे. कारखाना उशिरा ऊस नेत असल्याने नुकसान होत आहे. तसेच वेळेवर पैसे देण्यातही चालढकल होते. यामुळे ऊस उत्पादक आर्थिक अडचणीत आले आहेत.

-प्रकाश डुरे-पाटील, टाकळी, जि. लातूर

दर्जेदार बियाणे द्यावे

हवामान बदलामुळे रब्बी पिकावर विपरीत परिणाम झाला आहे. पिकांवर कीड, रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसत आहे. हे लक्षात घेता हवामान अनुकूल पीक पद्धतीसाठी मार्गदर्शन करावे, तसेच शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध करून द्यावे.

- भीमराव काळे, सुंदरवाडी, जि. छत्रपती संभाजीनगर

वेळ गेल्यावर खरेदी केंद्र सुरू

शेतकऱ्याकडून सोयाबीन, तूर, उडीद, मूग व कापूस खरेदी करण्यासाठी शासन केंद्र सुरू करते. परंतु ते वेळेवर सुरू होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांकडे जावे लागते. यामुळे शेतीमाल खरेदीचा निर्णय शासनाने वेळेवर घ्यावा.

-विजय दहीहंडे-पाटील, बदनापूर, जि. जालना

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Watermelon Harvesting: गोड, दर्जेदार कलिंगडांसाठी उन्हाळ्यात काळजी आणि योग्य वेळी काढणी गरजेची

Agri Administration Discussion: नव्या गुणनियंत्रण संचालकाची चर्चा

Ujani Dam Water Release: उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडले

Lemon Rate: अमरावतीत लिंबाला ६००० ते ७००० रुपये दर

Rahul Gandhi Defamation Case: राहुल गांधी यांची भिवंडी न्यायालयात हजेरी

SCROLL FOR NEXT