Land Acquisition Agrowon
ॲग्रो विशेष

MIDC Land Acquisition : भूमिहीनांना योग्य न्याय देणार : उद्योगमंत्री सामंत

Mahindra Project Igatpurti : परिसरातील ६०० एकर क्षेत्रापैकी सुमारे १०० एकर क्षेत्रावर महिंद्रा कंपनी उद्योग सुरू करणार आहे. यासाठी सध्या सर्वेक्षणाची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, स्थानिक शेतकऱ्यांनी यापूर्वी जमीन देण्यास तीव्र विरोध दर्शविला होता.

Team Agrowon

Nashik News : आडवण-पारेगाव (ता. इगतपुरी) येथे औद्योगिक वसाहतीसाठी सर्व्हेक्षण करण्यास शेतकऱ्यांनी सहमती दर्शविली आहे. सर्व्हेक्षणाचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर भुमिहीनांना योग्य न्याय दिला जाईल, असे आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्थानिक शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला दिले.

परिसरातील ६०० एकर क्षेत्रापैकी सुमारे १०० एकर क्षेत्रावर महिंद्रा कंपनी उद्योग सुरू करणार आहे. यासाठी सध्या सर्वेक्षणाची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, स्थानिक शेतकऱ्यांनी यापूर्वी जमीन देण्यास तीव्र विरोध दर्शविला होता.

या पार्श्‍वभूमीवर बुधवारी (ता. ११) उद्योगमंत्री सामंत यांच्या या अध्यक्षतेखाली मुंबईतील मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीस खासदार राजाभाऊ वाजे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, प्रांताधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी ओमकार पवार, एमआयडीसीचे अधिकारी आणि शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ उपस्थित होते.

आजवर शासनाने इगतपुरी तालुक्यात विविध प्रकल्पांसाठी ५० टक्क्यांहून अधिक जमीन संपादित केली आहे. त्यामुळे तालुक्यातील शेती धोक्यात आली असून, पुन्हा एकदा बागायती व शेतीसाठी उपयुक्त जमीन प्रकल्पासाठी घेतली जात असल्याने शेतकऱ्यांत नाराजी आहे. शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेतल्यानंतर उद्योगमंत्री सामंत म्हणाले, की जमीन संपादनाबाबत असलेला विरोध स्वाभाविक आहे.

मात्र, सर्व्हेक्षण पूर्ण झाल्याशिवाय कोणत्या गटातील किती क्षेत्र संपादित होईल, याबाबत माहिती मिळू शकत नाही. भूमिहीन होणाऱ्या स्थानिकांवर कोणताही अन्याय होणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले. त्यानंतर शेतकऱ्यांनी सहमती दर्शविली.

सर्व्हेक्षण पूर्ण झाल्यानंतर भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी नाशिकमध्ये प्रशासन व शेतकऱ्यांची बैठक आयोजित करावी, अशी मागणी खासदार वाजे यांनी मंत्री सामंत यांच्याकडे केली. मंत्री सामंत यांनीही होकार दर्शविताना सांगितले की, या बैठकीत भूसंपादनासाठीचे दरही घोषित केले जातील. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

इगतपुरीमधील हा प्रश्न सामोपचाराने सुटणे आवश्यक आहे. शेतकरी येथील भुमिपुत्र आहेत. त्यांना विश्वासात घेऊनच पुढे पाऊल टाकले पाहिजे. बैठक अत्यंत सकारात्मक पार पडली असून, उद्योगमंत्री आणि शेतकरी दोन्ही बाजूंनी समाधान व्यक्त करण्यात आले आहे.
- राजाभाऊ वाजे, खासदार, नाशिक
उद्योगमंत्र्यांच्या बैठकीत शेतकऱ्यांनी सर्वेक्षणास सहमती दर्शविली आहे. दोन ते तीन दिवसांत सर्व्हेला प्रारंभ होईल लवकर काम पूर्ण केले जाईल. डोंगर उताराच्या जागेचे संपादन केले जाणार नसून भूमिहीनांची यादी केली जाईल.
- ओमकार पवार, प्रांताधिकारी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Maharashtra 2026 : दुष्काळाच्या स्थितीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Maharashtra Cabinet Decisions: साखर कारखाने, ऊस शेतकऱ्यांना दिलासा; ७५० कोटींच्या सॉफ्ट लोन धोरणाला मंजुरी, मुख्यमंत्र्यांची माहिती

Dam Water Storage Update: यावल, रावेरातील प्रमुख सिंचन प्रकल्प भरले

Maharashtra Rain Update: विदर्भातील चार जिल्ह्यांत पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात उघडीप कायम

Rainfall Deficit: पावसाअभावी राज्यात चिंताजनक स्थिती; शेतकरी- शेतमजुरांच्या हिताचा सरकार विचार करणार : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

SCROLL FOR NEXT