Farmer Protest Agrowon
ॲग्रो विशेष

Punegaon Canal Water : पुणेगाव कालव्याच्या हक्काच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचा लढा

शासकीय यंत्रणेच्या तुघलघी कारभारामुळे पुणेगांव कालव्याचे हक्काच्या आवर्तनावर पाणी सोडण्याची वेळ रेडगाव (ता. निफाड) येथील शेतकऱ्यांवर आली आहे.

Team Agrowon

Nephad News : शेतीमालाच्या बाजारभावासाठी संघर्ष करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सध्याची स्थिती दुष्काळात तेरावा महिना ठरत आहे.

शासकीय यंत्रणेच्या तुघलघी कारभारामुळे पुणेगांव कालव्याचे हक्काच्या आवर्तनावर पाणी सोडण्याची वेळ रेडगाव (ता. निफाड) येथील शेतकऱ्यांवर आली आहे.

द्राक्षबागासह शेतीचे पीक धोक्यात आले आहे. यावरून संतप्त शेतकऱ्यांनी पिंपळगावच्या पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.

पुणेगावच्या धरण कालव्याचा उपप्रवाह असलेली चारी रेडगावला सुमारे अर्धा किमी अंतराने वळसा घालून जाते. गेल्या आठ वर्षांपासून कालव्याचे आवर्तनामुळे शेतीक्षेत्र ओलिताखाली येऊन सिंचनासह पिण्याला मिळत असल्याने द्राक्ष बागाचे क्षेत्रात वाढ होऊन सुमारे २०० हेक्टरपर्यंत पोहोचले.

तर कांदा, उसाचे क्षेत्रही सुमारे १०० हेक्टरपर्यंत पोहोचले. गेल्या आठ वर्षांपासून रब्बीच्या पिकांसह द्राक्ष बागांना आवर्तन दिले जात होते. पण यंदा मात्र आवर्तनाचे पाणी रेडगावपासून एक अंतरावर खडकजांब येथेच अडकले आहे.

कालव्याला सोडण्यात आलेल्या आवर्तनाचे पाणी चारीद्वारे पोहोचत नसल्याने उभ्या द्राक्ष बागा संकटात सापडल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. त्यामुळे शंभरहून अधिक शेतकऱ्यांनी पिंपळगावच्या पाटबंधारे विभागाचे कार्यालय गाठले.

संबंधित अधिकारी जागेवर नसल्याने भ्रमणध्वनीद्वारे शेतकऱ्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. पण कालव्याच्या चारीच्या स्थितीमुळे पाणी पोहोचत नाही, पाण्याचे आरक्षण रद्द केले अशी उडवाउडवीची उत्तरे अधिकाऱ्यांनी दिल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, संतप्त शेतकऱ्यांनी थेट कार्यालयातच ठिय्या आंदोलन सुरू केले. जोरदार घोषणाबाजीने कार्यालय दणाणून सोडले. आमदार दिलीप बनकर, माजी आमदार अनिल कदम यांच्याशीही शेतकऱ्यांनी संपर्क करून व्यथा मांडल्या.

या वेळी सरपंच गोरख चव्हाण, पोलिस पाटील महेंद्र जाधव, भाऊसाहेब पिठे, विजय चव्हाण, सोमनाथ चव्हाण, किरण सरोदे, सागर चव्हाण, योगेश चव्हाण, विलास चव्हाण, अण्णा सरोदे, दीपक सरोदे, विकास चव्हाण, ज्ञानेश्‍वर चव्हाण, विजय सरोदे, भाऊसाहेब चव्हाण, संकेत चव्हाण, रवींद्र सरोदे, गोरख सरोदे, संदीप चौधरी, तुकाराम चव्हाण, वैभव चव्हाण, संदीप चव्हाण, राकेश चव्हाण, बाळासाहेब चव्हाण आदी उपस्थित होते.

दरवर्षी मिळणारे आवर्तन यंदा मिळण्याची शक्यता नाही. शेतकऱ्यांची कोणतीही चूक नसताना पाणी मिळत नाही. द्राक्ष बागा जळून जाणाची भीती आहे. तत्काळ कालव्यातून चारीद्वारे द्यावे.
गोरख चव्हाण, सरपंच, रेडगाव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon 2026 In Kerala : मॉन्सूनचं २६ मे रोजी केरळात होणार आगमन; हवामानशास्त्र विभागाचा अंदाज

Monsoon Arrival 2026: माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान; मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात ५ दिवस पावसाची शक्यता

MSP Hike 2026: शेतीमालांच्या हमीभावाची वाढ अत्यंत तोकडी

Khat Dukan Karvai: : कृषी विभागाकडून १९ निविष्ठा केंद्रांवर सिंधुदुर्गात कारवाई

Onion Procurement: केंद्राकडून राज्यात १२ रुपये ३५ पैशानं कांद्याची खरेदी सुरु, मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती

SCROLL FOR NEXT