Agriculture Electricity Connection agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Electricity : विस्कळित वीजपुरवठा, कसे द्यायचे पाणी?

Agriculture Irrigation : ट्रान्सफॉर्मरचे फेज जात असल्याने शेतकऱ्यांना वीज पुरवठा सुरु करण्यासाठी मोठी जोखीम पत्करून फेज टाकण्याचीही कामे करावी लागत आहेत.

Team Agrowon

Washi News : विस्कळित वीज पुरवठ्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्यात अडचणी येत आहे. तसेच रात्रीच्या वेळी होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे शहरासह परिसरातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्यास अडचणी येत असल्याने उत्पन्नात घट येऊन शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांना भेडसावत आहे. याकडे वीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष होत असल्याने शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे.

शेतकऱ्यांचे मागील काही वर्ष कधी दुष्काळी परिस्थिती, तर कधी अतिवृष्टीमुळे आर्थिक नुकसानीचा फटका बसला आहे. यावर्षी परिसरात समाधानकारक पाऊस झाल्याने विंधन विहीर, साठवण तलावाच्या पाणी पातळीत चांगली वाढ झाल्याने रब्बी हंगामातील प्रामुख्याने ज्वारी, गहु, हरभरा आदी पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणात झालेली असून, उसाच्या क्षेत्रातही वाढ झाली आहे.

पेरणीनंतर जोमाने वाढ झाली; मात्र या पिकांना सद्यःपरिस्थितीमध्ये पाण्याची गरज असल्याने शेतकऱ्यांनी पिकांना पाणी देण्याचे काम सुरू केले आहे. विहिर, विंधन विहिरींना मुबलक पाणी असूनही वीज वितरण कंपनीकडून होणाऱ्या अनियमित; तसेच रात्रीच्या वीज पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यात अडचणी येत आहे.

ट्रान्सफॉर्मरचे फेज जात असल्याने शेतकऱ्यांना वीज पुरवठा सुरु करण्यासाठी मोठी जोखीम पत्करून फेज टाकण्याचीही कामे करावी लागत आहेत. दिवसभर शेतातील विविध कामे करून रात्री पुन्हा पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना संपूर्ण रात्र जागून काढावी लागत असल्याने शेतकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्नही उपस्थित होत आहे.

तसेच रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देत असताना शेतात अनेकदा विषारी जातीच्या सापासह वन्य प्राण्यांच्या हल्ल्याचा धोका असून, शेतकऱ्यांना आपला जीव धोक्यात घालून पिकांना पाणी द्यावे लागत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Relief: मराठवाडा दुष्काळग्रस्त जाहीर करून तातडीने मदत द्या

Exam Stress Relief : परीक्षा जवळ आलीये अन् टेन्शन वाढलंय? 'या' सोप्या टिप्सने ताण होईल छुमंतर!

Women Farmers Contribution: मोरोक्कोच्या बहरलेल्या शेतीतील अदृश्य हात

Interview With Rakesh Kaithwas : शेतकरी कंपन्यांच्या बळकटीकरणातून मूल्यवर्धनाला चालना

Bullock Safety Tips: बैलाच्या वजनानुसार बैलगाडीत किती ऊस भरावा?

SCROLL FOR NEXT