Soybean Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Cultivation Cost : सोयाबीनच्या लागवडीचा खर्चही निघेना

Team Agrowon

Jalana News : तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकाची लागवड होते. मात्र, यावर्षी पडलेल्या बाजारभावामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. विशेष म्हणजे सोयाबीनला यंदा सरकारने चार हजार ८०० रुपये हमीभाव जाहीर केला आहे. मात्र, इतकाही दर शेतकऱ्यांना मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. दरम्यान, शासनाने याबाबत शेतकरीहिताचा ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

घनसावंगी तालुक्‍यात यंदा सोयाबीनची ३० हजार ५२३ हेक्‍टर क्षेत्रांवर पेरणी करण्यात आली होती. प्रारंभीपासून सोयाबीनचे पीक हे रिमझिम पाऊस, येलो मोझॅक, विविध किडींचा प्रादुर्भाव, पिवळेपणा अशा अनेक संकटांवर मात करीत चांगले आले होते. मात्र, मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीने सर्वच पिकांचे नुकसान झाले.

त्यात कापसासोबत सर्वाधिक नुकसान सोयाबीनचे झाले आहे. शेतात सोयाबीन तयार होते. काही शेतकऱ्यांचे सोयाबीन हे शेतातच सडून गेले. शेतकऱ्यांनी अहोरात्र मेहनत करून जे सोयाबीन शिल्लक होते, त्याला रोज उन्हात ठेवून कोरडे केले. मजुरांना लावून त्याची सफाई करण्यात आली.

नव्याने काढलेले सोयाबीन शेतकऱ्यांनी विक्रीसाठी बाजारात नेले; परंतु व्यापारी सोयाबीनला वाढीव भाव देण्यास तयार नाहीत. सध्याच्या परिस्थितीमध्ये प्रतिक्विटंल ३५०० ते ४००० रुपयांपर्यंत भाव दिला जात आहे. व्यापारीवर्ग शेतकऱ्यांकडून सोयाबीन कमी भावाने खरेदी करून जादा भावाने विक्री करतात.

शेतकऱ्यांना सोयाबीन पिकासाठी एकूण एकरी २५ हजार रुपये खर्च आहे; तसेच मळणी यंत्रातून काढण्यासाठी प्रतिक्विंटल तीनशे रुपये द्यावे लागतात. एकरी पाच ते सहा क्विंटल उत्पन्न मिळत आहे. हा भाव पाहता सोयाबीन पिकासाठी करण्यात आलेला खर्चही निघत नाही.

एकीकडे भाव कमी असताना ते खरेदी केंद्रावर नेण्यासाठी वाहतूक खर्च एक हजार रुपये, दहा रुपये प्रत्येक पोत्याला हमाली घेतली जात आहे. त्यामुळे हातात काहीच पडत नाही. याउलट अडत दुकानदारांनी बाजारभाव आणखी कमी केला आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची लूट होत आहे.
- नबाजी पितळे, शेतकरी, पानेवाडी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : टोमॅटोच्या भावात काहिशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत सध्याचे टोमॅटो दर ?

Soybean Crop : चार एकरावरील सोयाबीन पिकावर फिरवला रोटाव्हेटर

Mahatma Phule Crop Loan Scheme : पीक कर्ज परतफेड केली; आम्हालाही लाभ द्या, वंचित शेतकऱ्यांची मागणी

Jal Jivan Mission : जलजीवन मिशनच्या ठेकेदारांचे कामबंद

Pusad Grain Market : तब्बल वीस दिवसांनंतर पुसदचा धान्य बाजार सुरू

SCROLL FOR NEXT