Pusad Market
Pusad MarketAgrowon

Pusad Grain Market : तब्बल वीस दिवसांनंतर पुसदचा धान्य बाजार सुरू

Grain Damage : अतिवृष्टी झाल्यामुळे पुसद येथील धान्य बाजार तब्बल १९ दिवस बंद होता. किसान मोर्चाच्या प्रयत्नाने अखेर २० दिवसांनंतर बाजार पुन्हा सुरू झाला.
Published on

Yavatmal News : अतिवृष्टी झाल्यामुळे पुसद येथील धान्य बाजार तब्बल १९ दिवस बंद होता. किसान मोर्चाच्या प्रयत्नाने अखेर २० दिवसांनंतर बाजार पुन्हा सुरू झाला. पुसद तालुक्यात ३१ ऑगस्टच्या मध्यरात्री ढगफुटीसदृश झालेल्या अतिवृष्टीमध्ये पावसाचे पाणी धान्य बाजारामध्ये साचून व्यापारी वर्गाचा असलेला माल पाण्यात भिजला.

त्याचप्रमाणे अपुऱ्या सुविधांमुळे मार्केट कमिटीमध्ये पाणी साचून होते. या कारणामुळे सुरुवातीला काही दिवस धान्य बाजारामध्ये खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद होते. परंतु १९ सप्टेंबरपर्यंत धान्य बाजारामधील खरेदी-विक्री सुरू न झाल्यामुळे शेतकऱ्यांना आपला माल कमी दराने खासगी व्यापाऱ्यांना विकावा लागत होता.

Pusad Market
Agriculture Commodity Market : कापसाच्या दरात नरमाईचा कल

किसान मोर्चाने ही बाब लक्षात घेऊन निवेदन देऊन व प्रत्यक्ष भेटून धान्य बाजार सुरू करण्याबद्दल सचिव व संचालकाला विनंती केली होती. परंतु बाजार सुरू न झाल्यामुळे पुन्हा दुसऱ्यांदा किसान मोर्चाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी धान्य बाजाराला भेट देऊन व्यापारी, अडते, किसान मोर्चाचे पदाधिकारी, संचालक मंडळ व पदाधिकारी यांची संयुक्त बैठक झाली.

Pusad Market
Agriculture AI Technology : गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी ‘एआय’ तंत्रज्ञान

किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विनोद जिल्हेवार यांनी शेतकऱ्यांचे हाल होत आहेत व आर्थिक नुकसान होत असल्यामुळे बाजार त्वरित सुरू करावा, अशी मागणी केली. या वेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शेख कौसर, उपसभापती अभय राठोड, संचालक अभिजित पवार यांच्यासह व्यापारी विजय भांगडे, संतोष कराळे, पिंटू फुके, अडते कैलास गादेवार व इतर सर्व व्यापारी वर्गासह पदाधिकाऱ्यांनी या विनंतीस प्रतिसाद देऊन शुक्रवारपासून (ता. २०) बाजार पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन दिले.

या बैठकीसाठी किसान मोर्चाचे पदाधिकारी माजी सचिव सुभाष पदमवार, माधवराव भरगाडे, गोविंदराव कुबडे, सुधाकर चव्हाण, शुभम राठोड, आशिष चव्हाण, अनिल पांडे, संजय लोंढे यांच्यासह मनसेचे जिल्हाध्यक्ष अभय गडम उपस्थित होते. किसान मोर्चाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या हिताची बाजू धरून बाजार सुरू करण्याबद्दल आवाहन केल्यानुसार अखेर तब्बल वीस दिवसांनंतर शुक्रवारपासून (ता. २०) पुसदचा धान्य बाजार सुरू झाला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com