Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : जळगाव जिल्ह्यात व्याजासह पीक विमाधारकांना परतावे द्या ; शेतकऱ्यांची मागणी

Crop Insurance Refund : जिल्ह्यात २०२४ मध्ये खरीप पीकविमा योजनेत सहभागी झालेल्या अनेक विमाधारक शेतकऱ्यांना परतावे प्राप्त झालेले नाहीत. हे परतावे विमा संरक्षण कालावधी संपल्यानंतर लवकरात लवकर विमाधारकांना मिळणे अपेक्षित होते.

Team Agrowon

Jalgaon News : जळगाव ः जिल्ह्यात २०२४ मध्ये खरीप पीकविमा योजनेत सहभागी झालेल्या अनेक विमाधारक शेतकऱ्यांना परतावे प्राप्त झालेले नाहीत. हे परतावे विमा संरक्षण कालावधी संपल्यानंतर लवकरात लवकर विमाधारकांना मिळणे अपेक्षित होते. परंतु परतावे न मिळाल्याने विमाधारकांना व्याजासह हे परतावे दिले जावेत, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

जिल्ह्यातील सुमारे चार लाख १२ हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी खरिपासंबंधी पीकविमा योजनेतून विमा संरक्षण घेतले होते. हे विमा संरक्षण खरीप २०२४ मधील हंगामासाठी होते. हा विमा संरक्षण कालावधी संपल्यानंतर काही दिवसात परतावे पात्र विमाधारकांना मिळणे अपेक्षित होते. परंतु परतावे विमाधारकांना मिळाले आहेत. विमाधारक भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. पण विमा कंपनी वेळकाढूपणा करीत आहे.

हे परतावे लवकरच देवू, अशी बतावणी विमा कंपनी व कृषी विभाग करीत आहे. यामुळे शेतकरी संभ्रमात आहेत. कारण पात्र विमाधारकांच्या याद्या, परतावा निधी बँकांत आला आहे की नाही, याबाबत कुणीही स्पष्टपणे सांगत नाही. परताव्यांना यंदा मोठा विलंब झाला आहे.  पुढील आठवड्यात  न मिळाल्यास शेतकऱ्यांना व्याजसह हे परतावे मिळायला हवेत.

शेतकऱ्यांकडून पीक कर्ज भरण्यास विलंब झाल्यास व्याज व त्यावर आणखी व्याज, शुल्क लावले जाते, असाच नियम विमा कंपनीलाही लागू करावा, अशी मागणी केली जात आहे.
पीकविमा योजना विमा कंपनीच्या फायद्यासाठीच चालविली जात आहे. ज्या वेळी शेतकऱ्यांचा लाभ होताना दिसतो, त्या वेळी नियम, कायदे, अटी विमा कंपनी व कृषी विभाग पुढे करतो.

हेच नियम विमा कंपनी व शासनालाही लागू आहेत. कृषी विभागाच्या आडमुठेपणा व नसत्या बाबी उकरण्याच्या प्रकारामुळे जिल्ह्यातील प्रामाणिक शेतकऱ्यांना हकनाक त्रास होत आहे, असा मुद्दाही शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gladiolus Farming: डोंगराळ नागालॅंडमध्ये ग्लॅडिओलसची यशस्वी शेती

Fruit Farming: आपल्या फळांची प्रतिमा दुय्यम का?

Cyclone Threat: वेध चक्रीवादळांचा!

Pune Ganesh Festival: पुण्यात गणेशोत्सवाला दिमाखात प्रारंभ

Rice Crop Update: पावसाची उघडीप; भात पिके वाढीच्या अवस्थेत

SCROLL FOR NEXT