Crop Insurance Fraud Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance Fraud : विम्याच्या नावाने शेतकऱ्यांची सव्वादोन लाखांची फसवणूक

Agriculture Fraud : फळपीक विमा काढून देतो, अशी बतावणी करून अनेक शेतकऱ्यांकडून पैसे घेऊन त्यांची फसवणूक करण्यात आल्याची बाब उजेडात आली आहे.

Team Agrowon

Amravati News : फळपीक विमा काढून देतो, अशी बतावणी करून अनेक शेतकऱ्यांकडून पैसे घेऊन त्यांची फसवणूक करण्यात आल्याची बाब उजेडात आली आहे. नीलेश दिनेश देशमुख (वय ३९) यांच्या तक्रारीवरून वरूड पोलिसांनी संशयित अमोल चरणदास क्षीरसागर (वय ३०, शिवाजीनगर, वरुड) विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अमोल क्षीरसागर याने नीलेश देशमुख सोबत आधी फळ पीकविमा काढून देण्याचे सांगून त्यांचा विश्‍वास संपादन केला. त्यानंतर त्यांच्याकडून पैसे घेतले. क्षीरसागर याच्या संपर्कात गावातील इतरही काही शेतकरी होते.

त्यांच्या कडूनही अमोल क्षीरसागरने असेच आमिष दाखवून पैसे घेतले. शेतकऱ्यांनी पैसे दिल्यानंतर त्याचा पुरावा संशयित अमोलकडे मागितला असता त्याने संबंधित शेतकऱ्यांना विम्याच्या संगणकीकृत पावत्या त्यांना दिल्या.

२ नोव्हेंबर २०२२ ते २६ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत अमोल क्षीरसागर याने नीलेश देशमुखसह अन्य शेतकऱ्यांकडून जवळपास २ लाख २७ हजार ३८४ रुपये इतकी रक्कम घेतली. परंतु दोन वर्षांतही कोणालाही योजनेचा लाभ मिळाला नाही. सुरुवातीचे काही दिवस संशयिताने टाळून नेले. त्यामुळे तक्रार दाखल केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Processing Industry: अचलपुरातील कापूस प्रक्रिया उद्योगाची चाके थांबलेलीच!

Illegal Sand Mining: अवैध वाळू उत्खननावर ‘महसूल’ची धडक कारवाई

Uddhav Thackeray: शेतकऱ्यांची थट्टा करणाऱ्या कंपन्यांवर सरकार कारवाई करणार का?; उद्धव ठाकरेंचा सवाल

Urea Seizure: युरियाची विनापरवाना वाहतूक प्रकरणी पाथरी येथे गुन्हा दाखल

MahaVistar App: पंधरा हजारांवर शेतकऱ्यांकडून ‘महाविस्तार’ ॲपवर नोंदणी

SCROLL FOR NEXT