Fraud News Agrowon
ॲग्रो विशेष

Fraud News : बुलडाण्यातील जानेफळ परिसरात शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून लाखोंची फसवणूक

Shetkari Fasvanuak : खेडा खरेदीमध्ये लाखोंची फसवणूक झाल्याची घटना पुन्हा एकदा जिल्ह्यात समोर आली आहे. यापूर्वी अनेक घटना घडलेल्या असून, व्यापाऱ्यांनी जादा भावाचे आमिष दाखवत शेतकऱ्यांना फसवले.

Team Agrowon

Buldana Farmer News : खेडा खरेदीमध्ये लाखोंची फसवणूक झाल्याची घटना पुन्हा एकदा जिल्ह्यात समोर आली आहे. यापूर्वी अनेक घटना घडलेल्या असून, व्यापाऱ्यांनी जादा भावाचे आमिष दाखवत शेतकऱ्यांना फसवले.

आठ दिवसांत शेतीमालाचे पैसे देतो, असे सांगून मेहकर तालुक्यातील काही शेतकऱ्यांकडून ९९ लाख रुपये किमतीचे सोयाबीन व तूर खरेदी करीत याचे पैसे न देताच ४ जणांनी फसवणूक केली. जानेफळ पोलिसांनी कैलास राधाकृष्ण ढवळे याच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

जानेफळ पोलिसात शेतकरी कृष्णा भीमा चव्हाण (रा. देऊळगाव साकरशा) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की देऊळगाव साकरशा येथील कैलास ढवळे यांनी त्यांच्यासह इतर शेतकऱ्यांकडून ७ हजार रुपये क्विंटल याप्रमाणे १ हजार २३७ क्विंटल सोयाबीन (किंमत ८६ लाख ६० हजार ४७० रुपये) आणि ९ हजार रुपये भावाने १३८ क्विंटल तूर (किंमत १२ लाख ४८ हजार ३०० रुपये) असा ९९ लाख ८ हजार ७७० रुपयांचा माल खरेदी केला.

आठ दिवसांत पैसे देतो असे सांगून काही महिने झाले तरी पैसे दिलेले नाहीत. शिवाय त्यांनी दिलेले धनादेशही वटले नाहीत.

पैशाची मागणी केली असता कैलास व त्याच्या कुटुंबीयांनी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. कैलास ढवळे, आशिष ढवळे, किरण कैलास ढवळे, चिऊ आशिष ढवळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

BG-7 Technology: देशात ‘बीजी-७’ उपलब्धतेचा दावा खोटा: विजय जावंधिया

ICAR, Mahyco Agreement: संशोधन-विस्तार क्षेत्रात ‘आयसीएआर’-महिकोत करार

Agriculture Department: उपसंचालक किरण जाधव यांना दक्षता पथकातून हटविले

Maharashtra Politics: मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

Veterinary Hospitals: राज्यात ३५७ ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्यांना मिळणार नवीन इमारती

SCROLL FOR NEXT