Agriculture GST Agrowon
ॲग्रो विशेष

Agricultural GST : ‘जीएसटी’चा भार शेतकऱ्यांना झेपेना

Agriculture Input GST Issue : उत्पादन खर्च वाढत चालला असून अनेकदा कमी उत्पादन मिळून शेतीमालाला भाव मिळत नाही. खतावर ५ टक्के, कीडनाशकांवर १८ टक्के सरसकट जीएसटी आकारला जातो.

Team Agrowon

Buldana News : केंद्र व राज्य शासन एकीकडे शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनाचे लाभ घेण्यासाठी सातत्याने प्रोत्साहीत करीत असते. यासाठी ८० टक्क्यांपर्यंत अनुदान मिळते. हे अनुदान महिनोमहिने मिळत नसतानाच या सूक्ष्म संच, खते, कीडनाशकांना लावलेला ५ ते १८ टक्क्यांपर्यंतचा जीएसटीचा भारही डोईजड झाला आहे. या ‘जीएसटी’मुळे शेतीचा उत्पादन खर्च कमालीचा वाढला आहे.

बुलडाणा जिल्ह्यात मुख्यतः सोयाबीन, कापूस, मका, तूर ही पिके जास्त प्रमाणात घेतली जातात. उत्पादन खर्च व त्या खर्चाच्या ५० टक्के नफा इतका हमीभाव देण्याची घोषणा केंद्र सरकारने केली होती. याउलट उत्पादन खर्च वाढत चालला असून अनेकदा कमी उत्पादन मिळून शेतीमालाला भाव मिळत नाही. खतावर ५ टक्के, कीडनाशकांवर १८ टक्के सरसकट जीएसटी आकारला जातो.

पूर्वीपेक्षा खते आणि कीटकनाशकांच्या किमती दुप्पट, तिपटीने वाढल्या आहेत. युरिया, डीएपी या मुख्य अन्नद्रव्यांना ५ टक्के, दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांना १२ टक्के, तर कीडनाशकांवर १८ टक्के जीएसटी आकारला जातो.

अगोदर ट्रॅक्टर आणि उपकरणांवर ६ टक्के मूल्य वर्धित कर आकारला जात होता. आता तो जीएसटीमध्ये १२ ते १८ टक्के आहे. त्यामुळे उपकरणे महागली आहेत. या कारणाने ठिबक सिंचन साहित्य विक्रीतही घट झाली, परिणामी शेतकरी सिंचनापासून लांब जात असल्यामुळे पाण्याचा अतिरिक्त वापर वाढत चालला आहे. म्हणून शेती संबंधीच्या सर्व निविष्ठांवरील जीएसटी सरसकट रद्द करावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

अवकाळी पाऊस, गारपीट, महापूर, अतिवृष्टी यामुळे खरे तर पीक घरात येईल की नाही याची शाश्वती राहलेली नाही. शेतीमालाला खर्चाच्या मानाने योग्य दर मिळत नाही. त्यातच केंद्र शासनाने जीएसटीच्या रुपातून शेतकऱ्याला लुटणे सुरू केले. शासनाने बियाणे, रासायनिक खते, औषधी तसेच ठिबक सिंचन, कृषी यंत्र, अवजारे व इतर अनेक बाबीसाठी आकारलेला जीएसटी डोईजड बनला. त्यातून शेतकऱ्यांना सूट दिली जावी.
अभिमन्यू पाटील, शेतकरी, तांदुळवाडी, ता. नांदुरा, जि. बुलडाणा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agri Machinery : महिला बचत गटांना ‘कृषी अवजारे बँके’ची सुवर्णसंधी

Akola Drought Update : अकोला जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा : गवळी

Jambatanda Storage Tank : जांबतांडा साठवण तलावासाठी प्रशासनाकडून हालचाली

Sangli Rainfall : सांगलीत ऑगस्टच्या पहिल्या २१ दिवसांत ५१ टक्के पाऊस

Water Security : नियोजनातून जलसुरक्षेचा पाया मजबूत करण्याचा प्रयत्न : डॉ. गेडाम

SCROLL FOR NEXT