Fig Farming  Agrowon
ॲग्रो विशेष

Fig Variety : अंजीर, सीताफळांच्या विविध वाणांचा शेतकऱ्यांना फायदा

Sitafal Variety : जाधववाडी (ता. पुरंदर) येथील अखिल भारतीय समन्वित अंजीर - सीताफळ संशोधन केंद्रातर्फे प्रक्षेत्रावरील अंजीर आणि सीताफळाच्या विविध वाणांची लागवड व त्यातील विविध प्रयोग पाहता संशोधनाचे काम चांगल्या रितीने पुढे जात आहे.

गणेश कोरे

Pune News : जाधववाडी (ता. पुरंदर) येथील अखिल भारतीय समन्वित अंजीर - सीताफळ संशोधन केंद्रातर्फे प्रक्षेत्रावरील अंजीर आणि सीताफळाच्या विविध वाणांची लागवड व त्यातील विविध प्रयोग पाहता संशोधनाचे काम चांगल्या रितीने पुढे जात आहे.

शेतकरी येथील प्रयोग पाहण्यासाठी आणि फळपीक व्यवस्थापन समजून घेण्यासाठी शिवारफेरीद्वारे नियमित येत आहेत, ही विशेष बाब आहे. शेतकरी हित संशोधन केंद्र जपत आहे, असे गौरवोद्गार राजस्थानच्या बिकानेर येथील केंद्रीय कोरडवाहू उद्यानविद्या संस्थेचे संचालक डॉ. जगदीश राणे यांनी येथे काढले.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अखिल भारतीय समन्वित अंजीर - सीताफळ संशोधन केंद्रातर्फे विद्यार्थी, शेतकरी आणि शास्त्रज्ञ यांच्या परिसंवादाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. या परिसंवादास प्रमुख पाहुणे म्हणून राजस्थानच्या बिकानेर येथील केंद्रीय कोरडवाहू उद्यानविद्या संस्थेचे संचालक डॉ. जगदीश राणे, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. रवींद्र बनसोड, महाराष्ट्र राज्य सीताफळ संघाचे अध्यक्ष श्याम गट्टानी, अंजीर संघाचे मंगेश लवांडे, राज्य कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेचे माजी उपाध्यक्ष विजय कोलते, संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप दळवे, वरिष्ठ संशोधन सहायक नितीश घोडके, डॉ. युवराज बालगुडे, वरिष्ठ संशोधन सहायक सुनील नाळे, राज्य अंजीर संघाचे उपाध्यक्ष रामचंद्र खेडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

परिसंवादात तज्ज्ञ शेतकरी प्रकाश कुलकर्णी, ज्ञानदेव मेमाणे, अनिल बोंडे, शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे अध्यक्ष व प्रगतिशील शेतकरी देवराम काळे, मंचाचे सदस्य दिलीप जाधव, सिद्राम भुजबळ, सुनील जाधव, सतीश काळे, पुरंदर तालुका सीताफळ संघाचे अध्यक्ष नीलेश काळे, पदाधिकारी, पुण्यातील कृषी महाविद्यालयातील चतुर्थ वर्षातील ग्रामीण कृषी जागरूकता आणि औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कार्यरत विद्यार्थी उपस्थित होते.

प्रास्ताविक डॉ. प्रदिप दळवे यांनी केले. सूत्रसंचालन नितीश घोडके यांनी केले. तर डॉ. युवराज बालगुडे यांनी आभार मानले. परिसंवादाच्या दरम्यान संशोधन केंद्राच्या फळबागांची शिवारफेरीही झाली. हा परिसंवाद यशस्वी आयोजनासाठी वरिष्ठ संशोधन सहायक सुनील नाळे, नितीश घोडके, संदीप लिंभोरे, सतीश काळे, अनंता झेंडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

अंजीर, सीताफळ ही कोरडवाहू फळपिके असली तरी शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. हे लक्षात घेऊन उत्पादकांनी विद्यापीठाने शिफारशीत केलेल्या कृषी तंत्रज्ञानाचा, पीक व्यवस्थापन, रोग - कीड व्यवस्थापन, बहर व्यवस्थापन आदींचाच वापर करावा. विद्यापीठाने शिफारस केलेल्याच्या फळपिकाच्या जाती लागवडीला निवडाव्यात.
डॉ. रवींद्र बनसोड, सहयोगी संशोधन संचालक, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, पुणे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Re-Sowing: दुबार पेरणीसाठी सरकार शेतकऱ्यांना मदत करणार, राज्य सरकारचा निर्णय, मंत्री बावनकुळेंची माहिती

Pandharpur Cycle Wari: पंढरपुरात रंगली ४ हजार सायकलस्वारांची आगळीवेगळी ‘सायकल वारी’

Kharif Sowing Delayed: पावसाच्या खंडामुळे खरिपाच्या पेरण्यांना ‘ब्रेक’

Farm Loan Waiver Scheme: लाखभर शेतकऱ्यांचा कोरा होणार ७/१२

Re Sowing Kharif: दुबार पेरणी करताना कोणती काळजी घ्यावी?

SCROLL FOR NEXT