Galmukat Dharan Yojana Agrowon
ॲग्रो विशेष

Galmukt Dharan Yojana : धरणातील गाळाने शेतकऱ्यांना फायदा

Galyukt Shiwar Scheme : गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेंतर्गत लोंढरे (ता. शहादा) येथील धरणातून काढण्याला शासनाने परवानगी दिल्यानंतर आजपर्यंत शेकडो शेतकऱ्यांना याचा फायदा झाला असून हजारो ब्रास गाळ शेतात टाकण्यात आला.

Team Agrowon

Nandurbar News : गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेंतर्गत लोंढरे (ता. शहादा) येथील धरणातून काढण्याला शासनाने परवानगी दिल्यानंतर आजपर्यंत शेकडो शेतकऱ्यांना याचा फायदा झाला असून हजारो ब्रास गाळ शेतात टाकण्यात आला. यातून उत्पादन भरघोस येईल व धरणात पाणीसाठा ही मुबलक होईल.

जिल्ह्यातील दिवसेंदिवस कमी होत जाणारे पर्जन्यमान, २०१० ते २०१९ पर्यंतच्या दशकात सरासरी ८८८ मिलिमीटर एवढे झाल्याची नोंद पाहता, त्यातून खरीप शेतीत होणारी वाढ व शेती, उत्पन्नात होणारी घट यावर उपाय म्हणून पावसाचे पाणी जिरवण्यासाठी कार्यक्रम हाती घेणे गरजेचे आहे.

जिल्ह्यात अनेक धरणे गाळाने भरलेली असून, त्यांची पाणी साठवण क्षमता कमी झालेली आहे. तसेच, अनेक धरणात पाण्याचा मृतसाठा असून गाळामुळे जमिनीत पाणी मुरण्याची क्षमता कमी झाली आहे.

भारतीय जैन संघटनेच्या प्रयत्नाने व प्रशासनाच्या माध्यमातून जिल्ह्यातील लोंढरे (ता. शहादा) येथील पहिल्या धरणाचा गाळ उपसण्याच्या प्रारंभ महिन्याभरापूर्वी पालकमंत्री व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला होता. पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांनी गाळ आपल्या शेतात टाकला.

शेवटपर्यंत हजारो ब्रास गाळचा उपसा झाला आहे. दररोज शेकडो वाहनांनी गाळ उपसा केला. परिसरातील शेतकऱ्यांना या गाळाचा फायदा होणार असून गाळ शेतात टाकल्याने उत्पादनात वाढ होतेच शिवाय धरणाची पाणी साठवण्याची क्षमता ही वाढते त्यामुळे उन्हाळ्यात पाणीटंचाईची भीती दूर होण्यास लाभ होणार आहे.

धरणातून सुमारे दोन हजार लहान डंपर, एक हजार ५०० मोठे हायवा डंपर, दोन हजार ट्रॅक्टर एवढा अंदाजित गाळ उपसल्याचे सांगण्यात आले. सध्या येथील गाळ उपसा बंद करण्यात आला असून आता दूधखेडा येथील धरणातून गाळ उपसा सुरु आहे.

गाळ मुक्त धरण, गाळयुक्त शिवार या योजनेचा फायदा परिसरातील शेतकऱ्यांना निश्चित होत असून शेकडो शेतकऱ्यांनी याचा लाभ घेऊन आपल्या शेतात धरणाच्या गाळ टाकला आहे. यातून निश्चितच उत्पादनात वाढ होईल.
ईश्वर माळी, शेतकरी, जयनगर (ता.शहादा, जि.नंदुरबार)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT