Farming Issues Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Shortage : पावसाने दडी मारल्याने शेतकरी बांधव चिंतेत

Farm Crisis : भिवंडी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वरुणराजाची आतुरता लागली आहे.

Team Agrowon

Mumbai News : भिवंडी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वरुणराजाची आतुरता लागली आहे. ऐन खरीप हंगामात शेतकऱ्यांनी भातपिकासह भाजीपाल्याची लागवड केली आहे, परंतु पाऊस पडत नसल्याने बळीराजा त्याची आतुरतेने वाट पाहत असून चिंतेत सापडला आहे.

मॉन्सूनने यावर्षी ठिकठिकाणी वेळेवर हजेरी लावली. त्यामुळे बळीराजाने खरीप हंगामात १६,६८९ हेक्टर क्षेत्रफळावर भातपिकासह भाजीपाला लागवड केली आहे, मात्र भिवंडीतील शेतकऱ्यांवर पाऊस अनेक दिवसांपासून रुसल्याने तालुक्यातील बळीराजा हवालदिल झाला असून आर्थिक गर्तेत सापडला आहे.

तत्पूर्वी शेतकऱ्यांना भातपीक लागवडीसाठी, शेतीच्या मशागतीसाठी ट्रॅक्टर, पेरणीसाठी भातपीक खरेदी, लावणी कामासाठी मजूर, असा आर्थिक खर्च सोसावा लागला आहे. त्यातच मध्यंतरी भिवंडीत खताच्या तुटवड्यामुळे अनेक शेतकऱ्यांना हेलपाटे मारून घाऊक दराने खत खरेदी करावी लागल्याचेही दिसून आले होते. त्यामुळे शेतकऱ्यांचा भातलावणीसाठी आर्थिक खर्च आणखी वाढला आहे.

अशातच पावसाच्या अनेक दिवसांपासूनच्या खंडामुळे आणि वाढत्या कडक उन्हामुळे भातपीक करपण्याची भीती शेतकरीवर्गातून व्यक्त केली आहे. पाऊस न आल्याने शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जाण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. गरज पडल्यास बाहेरील स्रोतातून पाणी देण्याची व्यवस्था करा. बांध तणमुक्त ठेवावे, जेणेकरून किडीची खाद्य वनस्पती नष्ट होऊन भातपिकावर किडींचा प्रादुर्भाव कमी होईल, असे सांगण्यात आले.

भाजीपाल्यालाही फटका

भिवंडी तालुक्यातील अनेक ठिकाणी उन्हाच्या काहिलीने भातपिकासह भाजीपाला लागवडीची जमीन कोरडी पडत चालली असून पिके सोनेरी होण्यास सुरुवात झाली आहे, तसेच कीड-रोग प्रादुर्भावाची भीतीही शेतकऱ्यांमधून वर्तवण्यात येत आहे. माल वरकस (उंच भागावरील जमीन)वरील भातशेतीला पावसाच्या खंडाचा अधिक प्रमाणात फटका बसत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे.

सद्यःस्थितीत भातपीक आणि भाजीपाल्याची परिस्थिती चांगली आहे, तसेच चालू आठवड्यात अधून-मधून पावसाच्या सरी सुरू राहिल्यास पीक परिस्थिती चांगली राहील, परंतु या आठवड्यात हवामान बदल व पावसाचा खंड असाच सुरू राहिल्यास पिकांना कीड-रोग प्रादुर्भाव होऊ शकतो.
ज्ञानदेव शिंदे, तालुका कृषी अधिकारी, भिवंडी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Relief: नाशिकसह तीन जिल्ह्यांतील १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना दिलासा, ८६ कोटी ६५ लाख मदत मंजूर

Agri University Research : कृषी विद्यापीठाची संशोधनात ओळख अधिक बळकट होईल

Ring Road Project : रिंग रोड बाधितांचा शासनाविरोधात एल्गार

Murrah Buffalo Subsidy: मुऱ्हा म्हैस खरेदीसाठी ‘चितळे’ देणार अनुदान

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड, पशू किसान क्रेडिट कार्डातील अडचणी सोडवा

SCROLL FOR NEXT