Tomato Rate agrowon
ॲग्रो विशेष

Tomato Sale Money : टोमॅटो विक्रीचे पैसे न मिळाल्याने शेतकरी आक्रमक

Tomato Farmer : पैसे मिळण्यासाठी लासलगाव बाजार समितीच्या कार्यालयासमोर ठिय्या

Team Agrowon

Nashik News : लासलगाव, जि. नाशिक : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सुमारे एक महिन्यापूर्वी लिलावात विक्री झालेल्या टोमॅटोचे पैसे शेतकऱ्यांना न मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी(ता. ११) बाजार समितीच्या आवारात कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत ९ लाख ५६ हजार ९६० रुपयांची थकित बाकी देण्याची मागणी केली.

लासलगाव बाजार समितीत हंगामामध्ये टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणात होत असते. या खरेदीसाठी बाजार समितीने ‘समृद्धी व्हेजिटेबल्स’ नावाने पाचोरे येथील टोमॅटो व्यापारी संदीप उगलमुगले यास परवाना दिलेला आहे. मागील महिन्यात आडतीत जवळपास ३७ टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी टोमॅटो विक्री केला.

मात्र त्यांना ९ लाख ५६ हजार ९६० इतके पैसे मिळालेले नाहीत. सौदा होऊन एक महिना होत आला तरी त्यांना पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे नाइलाजाने या शेतकऱ्यांना ठिय्या आंदोलन करण्याची वेळ आली. पैसे न मिळाल्याने शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

सदर व्यापारी पैसे देत नाही तोपर्यंत बाजार समितीच्या आवारात ठिय्या आंदोलन करण्यात येईल, जर पैसे मिळाले नाहीत तर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

२२ ऑक्टोबरला टोमॅटो विक्री केल्यानंतर उद्या पैसे देतो, या बोलीवर जवळपास महिना उलटला तरी मला माझे पैसे मिळाले नाही. माझी दिवाळी यामुळे सुद्धा अडचणीत गेली. या व्यापाऱ्यावर कारवाई करावी.

- विठ्ठल बोराडे, शेतकरी पाटोदा, ता. येवला

व्यापाऱ्याकडे माझे ४० हजार रुपये थकित आहे. ते अद्याप मला मिळालेले नाही. बाजार समितीने व्यापारावर कारवाई करून आमचे पैसे कसे मिळतील यासाठी प्रयत्न करावे.

- अनिल चिताळकर, शेतकरी, शिरवाडे वाकद, ता. निफाड

शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून व्यापाऱ्याला बाजार समितीने नोटीस दिली आहे. नोटीशीचे उत्तर आल्यानंतर बाजार समिती नियम कायदा ५३ नुसार कारवाई आणि वसुली करून शेतकऱ्यांचे पैसे देण्यात येतील.

- नरेंद्र वाढवणे, सचिव, बाजार समित

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Procurement Center : कोरेगावात सोयाबीन खरेदी केंद्र सुरू

Sugarcane Farming : शाहूवाडी परिसरात खुंटली आडसाली उसाची वाढ

Dairy Farming : दुग्ध व्यवसाय प्रत्येक शेतकऱ्याचा मोठा आधार

Water Crisis : ‘मोरणे’चे पात्र पडू लागले कोरडे

Achalpur APMC : अचलपूर बाजार समिती देणार व्यापाऱ्यांना ओळखपत्र

SCROLL FOR NEXT