Crop Harvesting  Agrowon
ॲग्रो विशेष

Post Monsoon Rain : अवकाळी पावसाची शेतकऱ्यांना धास्ती

Rain Update : भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्या हवामान अंदाजानुसार ८ ते १२ नोव्हेंबर काळात जिल्ह्यात पुढील पाच दिवसांत हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.

Team Agrowon

Nashik News : भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्या हवामान अंदाजानुसार ८ ते १२ नोव्हेंबर काळात जिल्ह्यात पुढील पाच दिवसांत हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. आकाश सुरुवातीचे दोन दिवस ढगाळ तसेच उर्वरित दिवस अंशतः ढगाळ राहील,असा अंदाज देण्यात आला होता.

मात्र गुरुवारी (ता. ९) नाशिक, इगतपुरी, सिन्नर व त्र्यंबकेश्‍वर तालुक्यात हलक्या सरी बरसल्या. त्यामुळे शेतकऱ्यांची दुपारनंतर तारांबळ उडाली होती. शुक्रवारी (ता. ९) ढगाळ वातावरण होते.

जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यातील इगतपुरी, त्रंबकेश्वर, पेठ सुरगाणासह नाशिक तालुक्यात भात पेरण्या झाल्या आहेत. अचानक आलेल्या पावसामुळे सोंगलेला भात झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल उडाली.

या ठिकाणी भात लागवडीतील पाणी अद्याप ओसरलेले नाही. पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव आहे. काही शेतकऱ्यांनी आगामी कांदा लागवडीसाठी सिन्नर पट्ट्यात कांद्याची रोपे टाकली आहेत त्यातच पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी धसका घेतला होता. इगतपुरी तालुक्यात काही ठिकाणी शेतकऱ्यांनी शेतात भात सोंगून ठेवला आहे.

पावसापासून भातपीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल उडाली. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव परिसरात गुरुवारी (ता. ९) दुपारी एक ते दीडच्या दरम्यान जोरदार पावसाच्या परी कोसळल्या. दुपारी अर्धा ते एक तास झालेल्या पावसामुळे शेतात कापून ठेवलेल्या पिके ओली झाली.

सिन्नर तालुक्यात पावसाची हजेरी

वसुबारसेच्या दिवशी गुरुवारी (ता.९) सायंकाळी पाचच्या सुमारास सिन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील ठाणगाव परिसरात साधारण २० मिनिटे अवकाळी पावसाने हजेरी लावली. दुपारपासून हवामानात अचानक बदल झाला.

ढगाळ वातावरण झाले होते. सिन्नर शहरात सायंकाळी पाचच्या दरम्यान तुरळक पावसाच्या सरी बरसल्या. दीपावली खरेदीसाठी बाहेर निघालेल्या नागरिकांनी दुकानाचा थोड्या वेळ आसरा घेतला, तर बळीराजाची काही ठिकाणी धावपळ दिसून आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT