Advance Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : विमा परताव्यासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन

Crop Insurance Compensation : खरीप हंगाम २०२२ मध्ये सोयाबीन पिकांचे नुकसान झाल्यानंतर भरपाईसाठी दावा दाखल केलेल्या शेतकऱ्यांना विमा परतावा द्यावा, या मागणीसाठी हदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी हदगाव येथे जलसमाधी आंदोलन करण्यात आले.

Team Agrowon

Nanded News : खरीप हंगाम २०२२ मध्ये सोयाबीन पिकांचे नुकसान झाल्यानंतर भरपाईसाठी दावा दाखल केलेल्या शेतकऱ्यांना विमा परतावा द्यावा, या मागणीसाठी हदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी हदगाव येथे जलसमाधी आंदोलन करण्यात आले. सध्या हदगाव येथे उपोषण सुरू केले आहे. याबाबत जिल्हा स्तरीय पीकविमा तक्रार निवारण समितीच्या बैठकीत याबाबत चर्चा झाली.

मागील वर्षीच्या खरिपात शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. याबाबत विमा कंपनी तसेच प्रशासनाच्या आवाहनानुसार हदगाव तालुक्यातील ४९ हजार शेतकऱ्यांनी नुकसानीबाबत भरपाई देण्यासाठी विमा कंपनीकडे विविध माध्यमांतून दावा दाखल केला होता. यात विमा कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी भरपाई देण्यात आली.

परंतु हदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी मात्र संपूर्ण ४९ हजार शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी करत मागील काही दिवसांपासून आंदोलन सुरू केले आहे. यात धरणे आंदोलन, जलसमाधी आंदोलन, आमरण उपोषण आदी आंदोलनाचा समावेश आहे. जिल्हा प्रशासनाने मात्र शेतकऱ्यांना शांततेचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (ता. १९) जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा स्तरीय पीकविमा तक्रार निवारण समितीची बैठक झाली. या वेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, विमा कंपनी प्रतिनिधी, शेतकरी प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

या वेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी अधिकाधिक शेतकऱ्यांना विमा परतावा देण्याचे सांगितले. यासोबतच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनीही शेतकऱ्यांना विमा परतावा देण्यासंदर्भात विमा कंपनीने सकारात्मक निर्णय घ्यावा, असे सूचित केले. याबाबत विमा कंपनी प्रतिनिधींनी वरिष्ठांशी चर्चा करुन शासननिर्णयानुसार योग्य निर्णय घेऊ असे सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT