Kharif Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Sowing : पेरण्यांची घाई न करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

Kharif Season 2025 : सध्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांकडून डीएपी खताची मागणी वाढली आहे. डीएपीमध्ये १८ टक्के नत्र आणि ४६ टक्के स्फुरद असते. डीएपीच्या कमतरतेमुळे पर्यायी खतांचा वापर आवश्यक आहे.

Team Agrowon

Latur News : जिल्ह्यात कापसाची लागवड ऐंशी हेक्टरवर पूर्ण झाली आहे. या स्थितीत बदलत्या वातावरणामुळे मॉन्सूनच्या गतीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरण्यांसाठी घाई करू नये, असे आवाहन आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवसांब लाडके यांनी केले आहे.

सध्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांकडून डीएपी खताची मागणी वाढली आहे. डीएपीमध्ये १८ टक्के नत्र आणि ४६ टक्के स्फुरद असते. डीएपीच्या कमतरतेमुळे पर्यायी खतांचा वापर आवश्यक आहे. यामध्ये एसएसपी (सिंगल सुपरफॉस्फेट) हा उत्तम पर्याय आहे,

ज्यामध्ये १६ टक्के स्फुरद, सल्फर आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात. तेलबिया पिकांसाठी एसएसपीचा वापर विशेष फायदेशीर आहे. डीएपीच्या एका गोणीऐवजी अर्धी गोणी युरिया आणि तीन गोण्या एसएसपीचा वापर प्रभावी ठरू शकतो.

याशिवाय, एनपीके १०:२६:२६, एनपीके २०:२०::१३, एनपीके १२:३२:१६ आणि एनपीके १५:१५:१५ अशा संयुक्त खतांचा वापर केल्यास नत्र, स्फुरद आणि पालाश यांसारखी अन्नद्रव्ये पिकांना मिळतात.

तसेच, टीएसपी (ट्रिपल सुपर फॉस्फेट) मध्ये ४६ टक्के स्फुरद असून, डीएपीच्या एका गोणीऐवजी अर्धी गोणी युरिया आणि एक गोणी टीएसपीचा वापर हा देखील चांगला पर्याय आहे. शेतकऱ्यांनी केवळ डीएपीवर अवलंबून न राहता बाजारात उपलब्ध असलेल्या पर्यायी खतांचा वापर करावा, असे आवाहन लाडके यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT