Shaktipeeth Highway Agrowon
ॲग्रो विशेष

Shaktipeeth Highway: शक्तिपीठ महामार्गाविरोधात १ जुलैला १२ जिल्ह्यांत चक्का जाम आंदोलन

Shaktipeeth Highway Protest: शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांतील शेतकरी १ जुलै २०२५ रोजी ‘चक्का जाम’ आंदोलन करणार आहेत. शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या ऑनलाईन पद्धतीने बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

Sainath Jadhav

Pune News: शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांतील शेतकरी १ जुलै २०२५ रोजी ‘चक्का जाम’ आंदोलन करणार आहेत. शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या ऑनलाईन पद्धतीने बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी, आमदार सतेज पाटील, खासदार विशाल पाटील यांच्यासह काही शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.

या महामार्गामुळे शेतकऱ्यांची सुपीक जमीन बाधित होणार असून, अनेक शेतकरी भूमिहीन होण्याच्या भीतीने आंदोलनाला पाठिंबा देत आहेत.

महामार्गाला विरोध का ?

हा प्रस्तावित महामार्ग नागपूर ते गोवा असा बांधला जाणार आहे आणि तो कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, यवतमाळ, वर्धा आणि नागपूर या १२ जिल्ह्यांमधून जाणार आहे. यामुळे हजारो हेक्टर सुपीक शेतजमीन भूसंपादनासाठी जाण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांचा आरोप आहे की, हा महामार्ग बांधण्याची खरी गरज नाही, आणि तो फक्त काही कंत्राटदार आणि मोठ्या कंपन्यांच्या फायद्यासाठी उभारला जात आहे. 

सतेज पाटील यांनी बैठकीत सांगितले, “या मार्गावर आधीच एक राष्ट्रीय महामार्ग आहे. नवीन रस्ता बांधून शेतकऱ्यांचे नुकसान करणे चुकीचे आहे. यापूर्वीही शेतकऱ्यांनी या प्रकल्पाविरोधात मोर्चे, निवेदने आणि आंदोलने केली आहेत. तरीही सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या गांभीर्याने घेतल्या नाहीत, असा शेतकऱ्यांचा आरोप आहे.

१ जुलैला होणाऱ्या चक्का जाम आंदोलनात शेतकरी रस्त्यावर उतरून आपला विरोध दर्शवणार आहेत. या आंदोलनाला सर्वपक्षीय नेत्यांचा पाठिंबा मिळाला आहे. कृती समितीने ठामपणे सांगितले की, जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत हा लढा सुरू राहील.

शेतकऱ्यांनी सरकारला इशारा दिला आहे की, त्यांच्या जमिनी वाचवण्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात. या आंदोलनामुळे शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार ; टोमॅटो दर टिकून, केळीला मागणी, आल्याला उठाव तर गवारची आवक टिकून

Sugarcane FRP Dues: थकीत 'एफआरपी'प्रश्नी ८१ साखर कारखान्यांना नोटिसा, सहकारमंत्री बाबासाहेब पाटलांची विधानपरिषदेत माहिती

Cotton Productivity Mission: कापूस उत्पादकता अभियान फसण्याचे संकेत

Rain Update In Maharashtra: कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील ६ जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज 

Crop Insurance: पीकविमा योजनेत शेतकऱ्यांना वेळेत नुकसान भरपाई मिळेना; कृषिमंत्र्यांची कबुली

SCROLL FOR NEXT