Fodder Crop  Agrowon
ॲग्रो विशेष

Fodder Crop : फक्त चाऱ्यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन होणार

शात चाऱ्याची टंचाई दिवसेंदिवस वाढतच आहे. केवळ हिरव्या चाऱ्याचीच नाही तर वाळलेला आणि प्रक्रियायुक्त चाराही कमी पडत आहे.

Team Agrowon

पुणेः देशात चाऱ्याची टंचाई दिवसेंदिवस वाढतच आहे. केवळ हिरव्या चाऱ्याचीच नाही तर वाळलेला आणि प्रक्रियायुक्त चाराही कमी पडत आहे. त्यामुळे सकारने आता केवळ चारा उत्पादन करणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपन्या (Farmer producer companies ) स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.


देशात मागील काही वर्षांपासून पशुधानासाठी चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे देशात पशुखाद्याचे दर वाढले आहेत. वाळलेल्या चाऱ्यासह, पेंड आणि इतर पोष्टक पशुखाद्याच्या दरात मागील दोन वर्षांमध्ये किलोमागे २५ ते ३० टक्क्यांनी वाढ झाली. त्यामुळं सरकारने चाऱ्याचा विचार धोरणाच्या पातळीवर आणावा अशी मागणी केली जात होती. सरकारने चारा धोरण आणलं तरच वाढलेली चाऱ्याची मागणी पूर्ण होऊ शकेल, असं सांगितलं जात होतं.

मागील महिन्यात देशाताली चारा संकटावर उच्च स्तरीय बैठक झाली. या बैठकीत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देशातील चारा टंचाईची गंभीरता मांडली. सर्वसाधारण वर्षात देशात हिरव्या  चाऱ्याचा तुटवडा १२ ते १५ टक्के असतो. तर वाळेलेल्या चाऱ्याचा तुटवडा २५ ते २६ टक्क्यांपर्यंत असतो. तसेच प्रक्रियायुक्त चारा ३६ टक्क्यांनी कमी असतो, अशी माहिती  या बैठकीत देण्यात आली.

आता सरकारने देशातील चारा उत्पादन वाढीसाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांचा आधार घेण्याचे ठरवले आहे. केंद्र सरकारने राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डला चारा उत्पादनासाठी १०० शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यास सांगितले आहे. या १०० शेतकरी उत्पादक कंपन्या याच वर्षात स्थापन केल्या जातील.

यापुर्वी २०२० मध्ये केंद्रीय मत्स्य, पशुधन विकास आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाने फक्त चारा उत्पादनासाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना करण्याची शिफारस केंद्रीय कृषी मंत्रालयाकडे केली होती. तसेच या शेतकरी उत्पादक कंपन्यांचा समावेश १० हजार शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्याच्या सरकारच्या महत्वाकांक्षी प्रकल्पात करण्याची शिफारस केली होती. कृषी मंत्रालायाने या प्रस्तावावर गांभीर्याने विचार केला. शेवटी नुकतेच या प्रस्तावाला अंतिम मान्यता मिळाली आहे. 

या १०० चारा उत्पादक शेतकरी उत्पादक कंपन्या राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डासोबत काम करतील. या कंपन्यांचा मुळ भर हा चारा उत्पादनावर असेल आणि दुय्यम काम हे पशुधन विकासाचे असेल.

 --

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Alert: राज्यात २ दिवस पावसाचा अंदाज; राज्यातील बहुतांशी भागात ढगाळ हवामानामुळे थंडी कमी

Ration Card Verification: रेशनचे पावणेदोन लाख संशयित लाभार्थी रडारवर!

Parliament Budget Session 2026: राहुल गांधींकडून नरवणेंच्या पुस्तकाचा उल्लेख, लोकसभेत गदारोळ, नेमकं काय झालं?

Mission Mausam : 'मिशन मौसम'साठी अर्थसंकल्पात वाढीव तरतूद; तर 'डीप ओशन मिशन'साठी तरतूद घटली

Tiger Attack: वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू

SCROLL FOR NEXT