Ravikant Tupkar Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Rate : आता सोयाबीनच्या दरवाढीसाठी सत्ताधाऱ्यांना गाव बंदी करा, तुपकरांचे थेट शेतकऱ्यांनाच आवाहन

Aslam Abdul Shanedivan

Pune News : सोयाबीनच्या दारासाठी मध्यप्रदेशमध्ये शेतकरी एकवटले आहेत. तेथे जोरदार आंदोलने सुरू आहेत. त्याच धर्तीवर राज्यात देखील शेतकरी सोयाबीनला भाव मिळावा, अशी मागणी करत आहेत. यावरून शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी रविवारी (ता. २२) राज्यातील सत्ताधारी मंत्र्यांसह नेत्यांना इशारा दिला आहे. तुपकर यांनी, सोयाबीनच्या दरवाढीसाठी सत्ताधाऱ्यांना गाव बंदी करा, असे आवाहनच शेतकऱ्यांना केले आहे.

राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी सोयाबीनला ८ हजार ५०० रुपयांचा भाव मिळावा, अशी मागणी करत आहेत. सोयाबीनची दरवाढ, शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, या मागणीसाठी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील आमरण उपोषणावर बसले आहेत. ते मागच्या ४ दिवसापासून औसा तहसील कार्यालयासमोर आंदोलन करत आहेत. या आंदोलनास तुपकर यांनी भेट घेतली.

यावेळी तुपकर म्हणाले, याआधी देखील मी सोयाबीन आणि कापूस शेतमालाच्या दरवाढीसाठी उपोषण केले आहे. मात्र सरकारने काही प्रमाणात आयात शुल्क कमी करून शेतकऱ्यांची बोळवण केली. त्यामुळे सरकारचं डोकं ठिकाणावर आणण्यासाठी आता गनिमीकावा करावा लागेल. शेतकऱ्यांनी सोयाबीन दरवाढीसाठी सत्ताधारी लोकप्रतिनिधींना गावबंदी करावं. त्यांना गावात येण्याआधीच रस्त्यावर अडवून जाब विचारावं, असे आव्हान तुपकर यांनी यावेळी केले आहे.

तुपकर यांनी सोयाबीन-कापूस-ऊस प्रश्नावरून पुन्हा एकदा आक्रमक लढाईचा निर्धार केल्याचे सांगितले. शुक्रवारी वलांडी येथे सोयाबीन-ऊस परिषदेत त्यांनी याबाबत माहिती दिली होती. ज्या पद्धतीने मध्य प्रदेशमध्ये सोयाबीनच्या दारासाठी शेतकरी आंदोलन करत आहेत. त्याप्रमाणे महाराष्ट्रसह इतर राज्यांमध्ये सोयाबीनच्या दारासाठी आंदोलन उभारण्याचा निर्धार त्यांनी बोलून दाखवला होता. काही जिल्ह्यात ऊसाला चांगला दर मिळतो पण अनेक जिल्ह्यात ऊसाला कमी दर मिळतो. अनेक कारखानदार शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक करतात. पण सरकार याकडे दुर्लक्ष करतं, त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही आपल्या हक्काच्या दामासाठी रस्त्यावर उतरण्याचा निर्धार केल्याचं तुपकर यांनी म्हटलं होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Chana Sowing : हरभरा पेरणीच्या क्षेत्रात वाढ होणार

Pesticide residues found in farmer's urine : धक्कादायक! तेलंगणाच्या काही शेतकऱ्यांच्या लघवीत कीटकनाशकांचे अंश?

Agriculture Department : कृषी कार्यालयाचा कारभार कुबड्यांवर

Hilsa Fish Export : बांगलादेशने हिलसा माशाच्या निर्यातीवरील बंदी उठवली; भारतला ३ हजार टन मासा करणार निर्यात

Irrigation Subsidy : सिंचन अनुदानाच्या वाटपासाठी शेतकऱ्यांच्या नशिबी प्रतीक्षाच

SCROLL FOR NEXT