Agriculture Department : कृषी कार्यालयाचा कारभार कुबड्यांवर

Agriculture Scheme : शासनाच्या कुठल्याही योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोचविण्यासाठी कर्मचाऱ्यांची भूमिका महत्‍वाची असते. तालुक्याचे एकूण ९१ हजार हेक्टर क्षेत्र आहे.
Agriculture Department
Agriculture DepartmentAgrowon
Published on
Updated on

Chalisgaon News : तालुक्यातील शेतकऱ्यांचा सर्वाधिक संबंध कृषी कार्यालयाशी येत असतो. या कार्यालयातील रिक्त पदांमुळे अनेक कृषी योजनांचा लाभ देताना तो वेळेवर मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.

या कार्यालयातील तालुका कृषी अधिकारी या प्रमुख पदाचा कार्यभार प्रभारींना पहावा लागत आहे. याशिवाय महत्त्वाच्या मंडळातील तीन कृषी अधिकाऱ्यांची पदे देखील रिक्त आहेत. परिणामी, कार्यालयात सध्या असलेल्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. येथील तालुका कृषी अधिकारी किशोर हडपे यांची वर्षापूर्वी बदली झाल्यापासून प्रभारी म्हणून मंडळ कृषी अधिकारी संजय चव्हाण हेच कामकाज पाहत आहेत.

Agriculture Department
Agriculture Department : कृषी संचालकपदांची पात्रता घटविली

योजनांपासून शेतकरी वंचित

शासनाच्या कुठल्याही योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोचविण्यासाठी कर्मचाऱ्यांची भूमिका महत्‍वाची असते. तालुक्याचे एकूण ९१ हजार हेक्टर क्षेत्र आहे. त्यात यावर्षी पन्नास टक्के कपाशी लागवड झाली आहे. काही ठिकाणी जास्तीचा पाऊस झाल्याने कपाशी पिवळी पडून वाया जात आहे.

अशातच कीड रोगाचाही प्रादुर्भाव वाढला आहे. अशा परिस्थितीत कृषी कार्यालयातून उपाययोजनांच्या दृष्टीने मार्गदर्शनाची अपेक्षा शेतकऱ्यांना असते. मात्र, हे मार्गदर्शन करण्यासाठी सध्या असलेले मनुष्यबळ तुलनेने कमी पडत आहे. तालुक्याचा विस्तार व पेरणीयुक्त क्षेत्र मोठे असल्याने शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करताना कर्मचाऱ्यांनाही मर्यादा येत आहेत.

Agriculture Department
Agriculture Department : कृषी सेवक कालावधी रद्द करा

कृषी सहाय्यकांची उडते तारांबळ

तालुका कृषी विभागात १३८ गावे येतात. या गावांचा कार्यभार अवघ्या २२ कृषी सहाय्यकांच्या खांद्यावर आहे. यामुळे कृषी सहाय्यकांची मोठी तारांबळ उडत आहे. एखाद्या योजनेचा लाभ मिळाला नाही तर त्यामागची कारणे न शोधता, शेतकरी कृषी सहाय्यकांनाच दोष देतात. कृषी सहाय्यकांची तब्बल २७ पदे रिक्त आहेत.

राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, जलयुक्त शिवार, फळबाग, कांदा चाळ यासारख्या योजनांचा लाभ देण्यासाठी कृषी सहाय्यकांची मुख्य भूमिका असते. रिक्तपदांमुळे सध्या असलेल्या कृषी सहाय्यकांची कसरत होत आहे. एकूणच ही परिस्थिती पाहता, किमान कृषी सहाय्यकांची तरी रिक्त असलेली २७ पदे तातडीने भरावीत, अशी मागणी होत आहे.

तालुका कृषी कार्यालयातील सद्यःस्थितील पदे

संवर्ग मंजूर पदे भरलेली पदे रिक्त पदे

तालुका कृषी अधिकारी ०१ ०० ०१

मंडल कृषी अधिकारी ०५ ०२ ०३

कृषी पर्यवेक्षक ०९ ०९ ००

कृषी सहाय्यक ४९ २२ २७

सहाय्यक अधीक्षक ०१ ०१ ००

वरिष्ठ लिपिक ०१ ०१ ००

लिपिक ०४ ०० ०४

वाहनचालक ०१ ०० ०१

अनुरेखक ०६ ०० ०६

शिपाई/पहारेकरी ०७ ०३ ०४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com