Farmer with Digital ID  Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer ID : नंदुरबारात शेतकरी आयडी नोंदणीला आजपासून सुरुवात

Digital Agriculture : कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शेतकऱ्यांना जलदगतीने सेवा देण्यासाठी युनिक आयडीचा उपयोग होणार असून, यात शेतकऱ्यांच्या नावावर शेतजमीन असेल तरच त्यांना फार्मर आयडी मिळणार आहे.

Team Agrowon

Nandurbar News : जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी फार्मर युनिक आयडी नोंदणीसाठी आज पासून सुरुवात झाली आहे. यासाठी क्षेत्रीय स्तरावरील काम करणारे ग्राम महसूल अधिकारी, कृषी सहायक व ग्रामविकास अधिकारी यांना शेतकरी बांधवांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी केले आहे.

कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शेतकऱ्यांना जलदगतीने सेवा देण्यासाठी युनिक आयडीचा उपयोग होणार असून, यात शेतकऱ्यांच्या नावावर शेतजमीन असेल तरच त्यांना फार्मर आयडी मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सेवा, सुविधा मिळू शकतील. शेतकऱ्यांसाठी अॅग्रिस्टॅक नावाने डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करण्यात येणार आहे.

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग यांच्याकडील शासन निर्णयानुसार अॅग्रीस्टॅक योजनेस मान्यता देण्यात आली असून, या योजनेत राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा व त्यांचा शेतांचा आधार संलग्न माहिती संच (शेतकरी नोंदणी) तयार करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांची नोंदणी करण्यासाठी ग्रामस्तरावर १६ डिसेंबर २४ पासून मोहीम सुरू करण्यात येणार आहे.

पहिल्या टप्प्यात प्रत्येक तालुक्यातून एक याप्रमाणे सहा गावांची निवड करण्यात करण्यात आली असून, तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक शेतकऱ्यांच्या फार्मर युनिक आयडीच्या नोंदी घेणार आहेत. यासाठी जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे.

शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेतांचा आधार संलग्न माहिती संच (शेतकरी नोंदणी) तयार झाल्यानंतर शेतकऱ्याला विविध योजनेचा लाभ, पीकविमा, आपत्ती व्यवस्थापनांतर्गत शेतकऱ्यांचे देय नुकसानभरपाई, तसेच शेतकऱ्यांना कृषी कर्ज व इतर सेवा देण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरणार आहे. गावात प्रत्यक्षात नोंदणीचे काम करण्यासाठी तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक नियुक्त करण्यात आले असून, जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रशिक्षण देण्यात आले आहे.

जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय अंमलबजावणी समिती नियुक्त करण्यात आली असून, यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय अधिकारी, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी, जिल्हा लिड बँक मॅनेजर यांचा समावेश आहे. तर तालुकास्तरावर उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती असून, यामध्ये तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांचा समावेश आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Re-Sowing: दुबार पेरणीसाठी सरकार शेतकऱ्यांना मदत करणार, राज्य सरकारचा निर्णय, मंत्री बावनकुळेंची माहिती

Pandharpur Cycle Wari: पंढरपुरात रंगली ४ हजार सायकलस्वारांची आगळीवेगळी ‘सायकल वारी’

Kharif Sowing Delayed: पावसाच्या खंडामुळे खरिपाच्या पेरण्यांना ‘ब्रेक’

Farm Loan Waiver Scheme: लाखभर शेतकऱ्यांचा कोरा होणार ७/१२

Re Sowing Kharif: दुबार पेरणी करताना कोणती काळजी घ्यावी?

SCROLL FOR NEXT