Farm Road Agrowon
ॲग्रो विशेष

Farm Road : अपुऱ्या निधीमुळे शेतरस्ते निर्मिती संथ

Rural Infrastructure : खानदेशात शेतरस्त्यांची यंदा अधिकची दैना झाली आहे. केळीसह पपई व अन्य शेतीमाल काढणीलाही यामुळे फटका बसला आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात शेतरस्त्यांची यंदा अधिकची दैना झाली आहे. केळीसह पपई व अन्य शेतीमाल काढणीलाही यामुळे फटका बसला आहे. शेतरस्ते मजबूत किंवा पक्के नसल्याने अनेक शेतकरी पावसाळ्यात काढणीवर येणऱ्या पपई, कलिंगड, भाजीपाला पिके व केळीची लागवड टाळत आहेत. यामुळे पाणंद रस्ते योजना अधिकची व्यापक करण्याची मागणीही केली जात आहे.

सध्या पाणंद रस्ते योजनाही थंड बस्त्त्यात आहे. निधी अपुरा असल्याने शेतरस्यांची कामे खानदेशात फारशी गतीने सुरू नसल्याची स्थिती आहे. पाणंद रस्ते योजनेतून सुमारे दीड हजार रस्ते झाले आहेत. या रस्त्यांचे मजबुतीकरणही काही भागांत नंतर नियोजन समितीच्या निधीतून झाले आहे.

काळ्या कसदार जमिनींच्या क्षेत्रात शेतरस्ते अधिकचे खराब झाले आहेत. वाफसा होत नसल्याने या भागात शेतरस्त्यांवरून जाणे सध्या अशक्य आहे. केळी, पपई आदी पिकांच्या क्षेत्रात अधिकच्या अडचणी शेतकऱ्यांना सहन कराव्या लागत आहेत. कारण या भागात केळी, पपई आदी पिके काढणीवर आहेत. त्यासाठी मजबूत शेतरस्ते हवे आहेत. परंतु शेतरस्त्यांअभावी केळी, पपई काढणीला फटका बसत आहे.

काळ्या कसदार जमिनीत समस्या बिकट

खानदेशात नंदुरबारमधील शहादा, तळोदा, नंदुरबार, धुळ्यातील शिरपूर, शिंदखेडा, धुळे, जळगावातील रावेर, यावल, अमळनेर, चोपडा, जळगाव, जामनेर, भडगाव-पाचोरा, मुक्ताईनगर, धरणगाव आदी भागांत केळी, पपईसह अन्य पिकांची शेती आहे. या भागात पाणंद रस्ते करण्यात आले. परंतु त्यांची संख्या कमी आहे.

जळगाव, शिरपूर या भागांत पाणंद रस्त्यांची संख्या बरी आहे. परंतु अन्यत्र समाधानकारक काम झालेले नाही. यामुळे या रस्त्यांसाठी शेतकऱ्यांकडून मागणी केली जात आहे. रावेर तालुक्यातही काही जुने रस्ते मजबूत व अधिक लांबीचे करण्याची मागणी केली जात आहे.

या योजनेसाठी नियोजन समिती निधी देते. पालकमंत्र्यांच्या अंतिम कार्यवाहीनंतर हे रस्ते व त्यांचे आराखडे तयार होतात, निधीही पुढे दिला जातो. यामुळे या रस्त्यांची संख्या वाढवून निधीही पुढे अधिकचा द्यावा. शेतरस्ते रूंद करण्यासह त्यांचे मजबुतीकरणही केले जावे, अशी मागणी केली जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Budget 2026: कोरडवाहू शेतीत कृषी संलग्न व्यवसायाला चालना

Agri Union Budget 2026: अन्नदाता शेतकऱ्यांचा भ्रमनिरास

Union Budget 2026: शेती बेदखलच!

Union Budget 2026: आर्थिक वाढीसाठी सर्वंकष प्रयत्नांचा संकल्प

Agriculture Union Budget: अन्नदाता शेतकरी पुन्हा एकदा वाऱ्यावर...!

SCROLL FOR NEXT