Crop Survey Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance Survey : पीकविमा सर्व्हेक्षकाकडून शेतकऱ्यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या

Crop Insurance : धामणगावरेल्वे तालुक्‍यातील धक्कादायक प्रकार

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
Amravati News : अमरावती ः पीकविमा कंपनीच्या सर्व्हेक्षकाने परतावा कमी देण्याच्या उद्देशाने चक्‍क ५२ शेतकऱ्यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या मारल्याचा धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान याप्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी कंपनीला बाधित शेतकऱ्यांना भरपाईचे आदेश दिले आहेत.

धामणगाव रेल्वे तालुक्‍यात गेल्या हंगामात अतिवृष्टी, संततधार पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीच्या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांनी नियमानुसार ४८ तासांच्या आत कंपनीच्या संबंधित ॲप, पोर्टलवर तक्रार नोंदविली. त्याआधारे कंपनीकडून रॅन्डम पद्धतीने सर्व्हेक्षण करण्यावर भर देण्यात आला. त्याकरिता मानधन तत्त्वावर सर्व्हेक्षकाची तरुणांची नियुक्‍ती करण्यात आली. त्याचवेळी नुकसान जास्त दर्शविण्याकरिता याच सर्व्हेक्षकाकडून पैशाची मागणी करण्यात आल्याचे आरोपही झाले. परंतु त्यात चौकशी न झाल्याने काहीच निष्पन्न झाले नाही. अशी स्थिती असताना आता सर्व्हेक्षकाने चक्‍क ५२ शेतकऱ्यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या मारत नुकसानच कमी दाखविण्याचा प्रताप केल्याचे खळबळजनक वास्तव समोर आले आहे.

चिंचपूर येथे गेल्या खरीप हंगामात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यावेळी शेतकऱ्यांनी सर्व्हेक्षणासाठी आलेल्या सर्व्हेक्षकाला वस्तुनिष्ठ नोंदी घेण्यास सांगितले. त्यावेळी संबंधित सर्व्हेक्षकाने योग्य ते नुकसान नोंदवीत शेतकऱ्यांच्या सह्या घेतल्या. मात्र त्यानंतर कमी नुकसान दाखविण्यासाठी चक्‍क बनावट पंचनामे तयार करण्यात आले. त्यावर शेतकऱ्यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. याच आधारावर या शेतकऱ्यांचा क्‍लेम नाकारण्यात आला. तालुक्‍यासह गावातील शेतकऱ्यांना भरपाई मिळाली असताना आपणाला का डावलले याची माहिती शेतकऱ्यांनी घेतला असता हा गंभीर प्रकार समोर आला.

जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत विमा कंपनीच्या प्रतिनिधीने खोट्या स्वाक्षरीची बाब मान्य केली आहे. भरपाई देण्यास कंपनीला निर्देश देण्यात आले आहेत. परंतु जिल्हा सरासरीच्या आधारावर देऊ असे कंपनी सांगते. मात्र नुकसानीच्या प्रमाणात भरपाई मिळावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
- राहूल सातपुते,
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अमरावती


दोन आठवड्यात भरपाई
खोट्या सह्या मारणाऱ्या सर्व्हेक्षकाने ज्या महसूल मंडळात सर्व्हेक्षण केले. त्या सर्व शेतकऱ्यांच्या पूर्वसूचनांची पुन्हा तपासणी करुन दोन आठवड्याच्या आत भरपाईचे आदेश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी कंपनीला दिले आहेत. याची अंमलबजावणी कशी होते, हे पाहणे औत्स्युक्‍याचे ठरणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT