Nagpur News : बोगस रासायनिक खते, कीटकनाशके व जैविक निविष्ठा उत्पदनाच्या एका कारखान्यावर कृषी विभागाच्या पथकाने छापेमारी केली. या कारवाईत तब्बल ५२ लाख ६१ हजार रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. विभागीय कृषी सहसंचालक उमेश घाटगे यांच्या नेतृत्वात शुक्रवारी (ता. ८) रात्री ही छापेमारी करण्यात आली.
नागपूरपासून २५ किलोमीटरवर असलेल्या खडगाव रोडवरील लावा गावात एका व्यक्तीने अवैध निविष्ठा उत्पादनाचा कारखाना उभारल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली होती. या माहितीची पहिल्या टप्प्यात खातरजामा करण्यात आली. त्यानुसार, लावा गावातील प्रशांत बोरकर यांच्या मालकीचे गोदाम परेश विजय खंडाईत यांनी भाडेतत्त्वावर घेतल्याचा खुलासा झाला.
या ठिकाणी परेश खंडाईत (वय ३२) यांनी एनजेपी ॲग्रोटेक प्रा. लि. या कंपनीचा फलक लावला. त्या माध्यमातून त्यांनी अवैध निविष्ठा उत्पादन चालविले होते. कृषी विभागाच्या पथकाने छापेमारी केली, त्या वेळी देखील कोणतीही मान्यता किंवा परवाना नसताना खत आणि कीटकनाशकांचे बॉटलिंग करण्याचे काम सुरूच होते.
निम पॉवर, भूशक्ती, ब्लॅक गोल्ड, वरदान गोल्ड, ॲग्रो मॅक्स गोल्ड, सिल्वर शाईन अशा विविध ब्रॅण्डनेमच्या पिशव्यांमध्ये या बोगस खते व निविष्ठांचा भरणा केला जातो. या वेळी घटनास्थळावरून वेस्टन, रिकाम्या बॉटल्स, पोते, पॅकिंग मशीन आणि रासायनिक खते, जैविक खते, द्रव्यरूप जैविक खते, रसायन असा एकूण ५२ लाख ६१ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला.
जप्त केलेल्या साहित्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीकामी पाठविण्यात आले आहेत. विभागीय कृषी सहसंचालक उमेश घाटगे, मुख्य गुण नियंत्रण अधिकारी प्रवीण देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका गुण नियंत्रण अकिधरी रिना डोंगरे, जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक मार्कंड खंडाईत यांनी ही कारवाई पार पाडली.
या वेळी कृषी विकास अधिकारी समाधान धुळधुळे, विभागीय गुण नियंत्रण निरीक्षक चंद्रशेखर कोल्हे, संदीप पवार, तालुका कृषी अधिकारी प्रभाकर मोतीकर, रवींद्र राठोड, वाडी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक राहुल सावंत, शिपाई महेश जुमनाके, चेतन मानकर यांचाही कारवाईत सहभाग होता. या प्रकरणी वाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.