Kharif Season 2025 Agrowon
ॲग्रो विशेष

Seed Fertilizer prices : शेतकऱ्यांना बियाणे, कीडनाशके योग्य दरात उपलब्ध करून द्या

Seed Shortage : काही वेळेस बियाण्याची टंचाई असते. या काळातही शेतकऱ्यांची पिळवणूक होणार नाही, त्यांना वणवण फिरावे लागणार नाही, यासंबंधी नियोजन केले जावे, अशाही सूचना देण्यात आल्या.

Team Agrowon

Jalgaon News : जिल्ह्यात खते, बियाण्यांची मागणी खरिपात असणार आहे. या कालावधीत शेतकऱ्यांना योग्य शिफारस केलेले बियाणे व कीडनाशके रास्त, निर्देशित दरात दिली जावीत, अशा सूचना राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी जिल्ह्यातील कीडनाशके, खते विक्रेत्यांना कार्यशाळेत दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनात नुकतीच ही कार्यशाळा झाली. त्यात वस्त्रोद्योग मंत्री सावकारेंसह जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर, जिल्हा अधीत्रक कृषी अधिकारी कुर्बान तडवी, कृषी विकास अधिकारी पद्मनाभ म्हस्के, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक विकास बोरसे, ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ बी. डी. जडे, महाबीजचे संजय देवरे, मोहीम अधिकारी विजय पवार, खते व कीडनाशके विक्रेते संघटनेचे कैलास मालू, उपाध्यक्ष राजीव पाटील, शेतकरी एस. बी. पाटील आदी उपस्थित होते.

या वेळी श्री. सावकारे यांनी खते व कीडनाशके विक्रेत्यांना विविध सूचना केल्या. जी खते व कीडनाशके जिल्ह्यात येतात. ती शिफारस केलेली व जिल्ह्यातील शेतीसाठी योग्य आहेत, का याचाही विचार करावा. अधिकाधिक नफा हा मुद्दा दूर करून शेतकऱ्यांना रास्त दरात खते, कीडनाशके व बियाणे उपलब्ध करून दिले जावे.

काही वेळेस बियाण्याची टंचाई असते. या काळातही शेतकऱ्यांची पिळवणूक होणार नाही, त्यांना वणवण फिरावे लागणार नाही, यासंबंधी नियोजन केले जावे, अशाही सूचना देण्यात आल्या एस. बी. पाटील म्हणाले, विषमुक्त अन्न व शेतीमाल तयार करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत. त्यासाठी जनजागृती तयार करणे आवश्यक आहे.

खते, कीडनाशके यांचा अतिवापर होणार नाही, यासाठी काम करण्याची गरज आहे. यानुसार खते व कीडनाशके विक्रेत्यांनी विषमुक्त अन्नासंबंधी कार्यवाही केली जाईल, त्यासाठी पाच हजार फलक तयार करून शेतकऱ्यांत जनजागृती केली जाईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

Maize Excellence Center: ‘मका उत्कृष्टता केंद्र’ स्थापनेच्या प्रस्तावावर चर्चा

Jayakwadi Dam Water Released: जायकवाडी धरणातून खेर्डा प्रकल्पात पाणी पोहोचले!

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT