Sugarcane FRP Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane FRP : सोलापूर, धाराशिवमधील कारखान्यांकडे २८७ कोटींची ‘एफआरपी’ थकली

Sugarcane Season : चालू गाळप हंगामात सोलापूर विभागातील सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील ३२ साखर कारखान्यांकडे १५ जानेवारीअखेर २८७.४७ कोटी रुपये ‘एफआरपी’ थकली आहे.

Team Agrowon

Solapur News : चालू गाळप हंगामात सोलापूर विभागातील सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील ३२ साखर कारखान्यांकडे १५ जानेवारीअखेर २८७.४७ कोटी रुपये ‘एफआरपी’ थकली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्याशी निगडित असलेल्या सर्वाधिक सहा कारखान्यांकडे ८० कोटी रुपये एफआरपी अडकली आहे.

सोलापूर विभागात सोलापूर व धाराशिव जिल्हे समाविष्ट आहेत. यंदा सोलापूर जिल्ह्यातील ३४, तर धाराशिव जिल्ह्यातील १४ अशा एकूण ४८ कारखान्यांचा हंगाम सुरू आहे. सोलापूर जिल्ह्यातील ३४ कारखान्यांनी एफआरपीचे एक हजार ६१८ कोटी व धाराशिव जिल्ह्यातील १४ कारखान्यांनी ४०३.१२ कोटी असे एकूण दोन हजार २० कोटी रुपये आतापर्यंत शेतकऱ्यांना दिले आहेत.

आरोगमंत्र्यांच्या सर्वाधिक सहा कारखान्यांचाही समावेश

सोलापुरातील २३ कारखान्यांकडे २२९.४९ कोटी, तर धाराशिवमधील ९ कारखान्यांकडे एफआरपीचे ५७.९८ कोटी रुपये थकित आहेत.

माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांच्याशी संलग्न कारखान्यांकडे एफआरपीचे १६.८५ कोटी, तर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कारखान्यांकडे १०.२१ कोटी रुपये थकित आहेत. पण आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याशी संबंधित सर्वाधिक सहा कारखान्यांचा त्यात समावेश आहे.

कारखानानिहाय थकित एफआरपी (कोटींत) ः

धाराशिव जिल्हा

विठ्ठलसाई १२.९०

भैरवनाथ (शिवशक्ती) १०.२५

भीमाशंकर १.६९

धाराशिव २.५४

भैरवनाथ, सोनारी १३.४२

लोकमंगल माउली १.६१

क्यूएनर्जी ०.८९

गोकुळ शुगर १०.७१

भैरवनाथ (तेरणा) ३.९७

कारखानानिहाय थकित एफआरपी (कोटींत)

सोलापूर जिल्हा

कारखाना थकित एफआरपी

सिद्धेश्‍वर १५.०५

संत दामाजी ८.८२

संत कूर्मदास १२.६५

लोकनेते २९.४०

लोकमंगल, बिबीदारफळ १.९६

लोकमंगल, भंडारकवठे ३.१३

सिद्धनाथ २.९५

जकराया ६.५१

इंद्रेश्‍वर ९.०६

भैरवनाथ, विहाळ १६.४०

भैरवनाथ, लवंगी २५.४५

युटोपियन ११.८४

भैरवनाथ, आलेगाव १०.२२

बबनरावजी शिंदे ६.५०

जयहिंद ०.८१

विठ्ठल रिफाइंड १०.३५

व्ही.पी. शुगर्स १०.६१

आष्टी १.१५

भीमा ९.८१

धाराशिव, सांगोला ६.९६

श्री. शंकर ०.५७

आवताडे शुगर्स ६.६०

विठ्ठल, वेणूनगर २२.६९

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop in Crisis : विदर्भात पावसाच्या खंडामुळे पिके धोक्यात

Fishing Crisis : मत्स्यदुष्काळामुळे रोजंदारीच संकटात

Udgir APMC : उदगीर बाजार समितीचे माजी सभापती हुडेंसह दोघे अपात्रच

Farm Road : ‘महसुल’ने केले १०४ पाणंद रस्ते खुले

Kharif Crop Loss : सांगली जिल्ह्यात पाणी देऊन जगवली खरीप पिके

SCROLL FOR NEXT