Paddy procurement  Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Procurement : भातखरेदी नोंदणीस मुदतवाढ

Paddy Production : भातखरेदीकरिता शासनाने ऑनलाइन नोंदणीची मुदत १५ जानेवारीपर्यंत वाढविली आहे. यापूर्वी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत होती. मात्र अधिकतर शेतकरी नोंदणीपासून वंचित असल्याने शासनाने ही मुदत वाढविली आहे.

Team Agrowon

Sindhudurg News : भातखरेदीकरिता शासनाने ऑनलाइन नोंदणीची मुदत १५ जानेवारीपर्यंत वाढविली आहे. यापूर्वी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत होती. मात्र अधिकतर शेतकरी नोंदणीपासून वंचित असल्याने शासनाने ही मुदत वाढविली आहे.

पणन हंगाम २०२३-२४ मधील खरीप हंगामातील भातविक्री करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीचा सात-बारा घेऊन नोंदणी करणे आवश्यक होते. त्यानुसार जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून जिल्ह्यातील ४३ पैकी ३० हून अधिक भातखरेदी केंद्रांवर भातखरेदी सुरू झाली आहे.

शासनाने भातखरेदीकरिता आवश्यक असलेली ऑनलाइन नोंदणीची मुदत ३१ डिसेंबर होती. परंतु अनेक शेतकरी अद्याप नोंदणी करावयाचे राहिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील तालुका खरेदी-विक्री संघाकडून नोंदणीची मुदत वाढवावी, अशी मागणी शासनाकडे करण्यात आली होती. त्यानुसार शासनाने १५ जानेवारीपर्यंत नोंदणीसाठी मुदतवाढ दिली आहे. हमीभाव खरेदीपासून शेतकरी वंचित राहू नयेत म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

भातखरेदीसाठी ऑनलाइन नोंदणीची मुदत १५ जानेवारीपर्यंत असून शेतकऱ्यांनी नोंदणी वेळेत पूर्ण करावी जेणेकरून कुणीही वंचित राहू नये.
डी. आर. पाटील, मार्केटिंग अधिकारी, सिंधुदुर्ग
यावर्षी पाऊस लांबल्यामुळे भातपीक कापणी उशिराने झाली. ज्या वेळी ऑनलाइन नोंदणी करायची होती. त्या वेळी नेटवर्कचा अभाव होता. त्यामुळे अनेक शेतकरी नोंदणीपासून वंचित राहिले होते. त्यामुळे मुदतवाढ मिळणे आवश्यक होते. त्यामुळे मुदतवाढीची मागणी आम्ही केली होती.
प्रमोद गावडे, अध्यक्ष, तालुका खरेदी-विक्री संघ, सावंतवाडी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangola Water Crisis: सांगोल्यातील बंधारे कोरडे; जलसंकट वाढले

Farmer Compensation: बाधित शेतकऱ्यांच्या मोबदल्यासाठी खलबते

Fruit Drop Subsidy Issue: संत्रा, मोसंबी, फळगळ अनुदानामध्ये गोंधळ

Fund Delay: स्थगितीला वाव देण्यासाठी निधी वर्ग करण्यास उशीर?

Maharajasva Campaign: महाराजस्व अभियान यशस्वी करण्यासाठी समन्वयाने काम करा: जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

SCROLL FOR NEXT