Soybean Rate Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Procurement Center : सोयाबीन खरेदी केंद्रावर ऑनलाइन नोंदणीस मुदतवाढ

Soybean Rate : खरिपात सर्वाधिक सोयाबीनची लागवड होत असल्याने उत्पादनही मोठ्या प्रमाणात होत आहे. यावर्षीही सोयाबीनचे उत्पादन चांगले निघाले आहे.

Team Agrowon

Satara News : जिल्ह्यात आधारभूत किंमत तथा हमीभाव दराने सोयाबीन खरेदी करण्यासाठी वाई केंद्रास मान्यता देण्यात आल्याने जिल्ह्यात सहा केंद्रांवर सोयाबीन खरेदी होणार आहे. तसेच केंद्रांवर सोयाबीन घालण्यासाठी ऑनलाइन नोंदणीची मुदत वाढवून ३० नोव्हेंबर करण्यात आली आहे.

जिल्ह्यात खरिपात सर्वाधिक सोयाबीनची लागवड होत असल्याने उत्पादनही मोठ्या प्रमाणात होत आहे. यावर्षीही सोयाबीनचे उत्पादन चांगले निघाले आहे. मात्र, बाजारपेठेत ऐन दीपावलीच्या तोंडावर व्यापाऱ्यांकडून सोयाबीनचा भाव प्रतिक्विंटल चार हजार १०० ते चार हजार ३०० रुपये इतका कमी निघालेला आहे.

प्रत्यक्षात बाजारपेठेतील हा भाव सोयाबीनच्या आधारभूत किंमत तथा हमीभावापेक्षा (प्रतिक्विंटल चार हजार ८९२) कमी असल्याने शेतकऱ्यात नाराजी होती. या पार्श्‍वभूमीवर शेतकरी वर्गातून सोयाबीनची हमीभाव दराने खरेदी करण्याची केंद्रे सुरू करण्याची मागणी होत होती.

या मागणीनुसार शासनाच्या सहकार व पणन विभागाने जिल्ह्यात तालुका सहकारी खरेदी विक्री संघ, बाजार समित्या आदी संस्थांच्या संयुक्त माध्यमातून, तसेच नाफेड आणि मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून सातारा, फलटण, कराड, कोरेगाव व मसूर येथे सोयाबीन हमीभावाने खरेदी केंद्रांना मान्यता दिलेली होती.

सहकार व पणन विभागाच्या अवर सचिव संगीता दि. शेळके यांनी एक पत्र काढले असून, त्यात म्हटले आहे की, राज्याच्या सहकार आणि पणन विभागाच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली २८ ऑक्टोबर २०२४ रोजी झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार २०२४-२५ मधील हमीभावाने खरेदी प्रक्रियेतील शेतकऱ्यांच्या ऑनलाईन नोदणी प्रक्रियेबाबत १५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.

सदर मुदतवाढ ३० नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच वाई केंद्रासही नव्याने मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यात हमीभाव खरेदी केंद्राची संख्या सहावर गेली असून १५ दिवस ऑनलाइन नोंदणी करता येणे शक्य झाले आहे. या केंद्रावर जास्तीत जास्त शेतकऱ्यांना नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

प्रत्यक्ष खरेदीस प्रारंभ

कोरेगाव केंद्रांवर १११ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून २१ शेतकऱ्यांच्या १२८ क्विंटल व मसूर केंद्रावर २९ शेतकऱ्यानी नोंदणी केली असून सहा शेतकऱ्यांच्या ६४ क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली आहे. सातारा येथे ४५ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून खरेदी-विक्री संघाचे वतीने वडूथ येथे लवकरच प्रत्यक्ष खरेदी सुरू होणार आहे.

फलटण येथे ७८ व कऱ्हाड केंद्रावर पाच शेतकऱ्यांनी नोंदणी झाली आहे. वाई येथील नवीन केंद्रावर शेतकऱ्याकडून ऑनलाइन नोंदणी होताच प्रत्यक्ष खरेदीस सुरुवात होणार आहे, अशी माहिती जिल्हा पणन अधिकारी हनुमंत पवार, जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रिक यांनी दिली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Uddhav Thackeray On Farmers: मोदींना विदेशाची पर्वा, शेतकऱ्यांचं काय? उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला

Dam Water Discharge : भंडारदरा, निळवंडे धरणांतून विसर्ग सुरू

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा प्रकरणी सीएससी चालकांविरुद्ध गुन्हा

Soybean Seed Rejection : सोयाबीनचे ५३ हजारांवर क्विंटल बियाणे नापास

Maharashtra Farmer Issue: संत्रा बागांवरील फायटोप्थोरा नुकसानीबाबत मदतीची मागणी

SCROLL FOR NEXT