Mango Export Agrowon
ॲग्रो विशेष

Mango Export : विकिरण प्रक्रिया करून १४० टन आंबा निर्यात

Mango Season : अणू संशोधन केंद्राच्या ‘कृषक विकिरण’ केंद्रातून आंब्यावर विकिरण प्रक्रिया होऊन अमेरिकेपाठोपाठ गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ऑस्ट्रेलियाला आंब्यांची निर्यात झाली आहे.

मुकूंद पिंगळे

Nashik News : अणू संशोधन केंद्राच्या ‘कृषक विकिरण’ केंद्रातून आंब्यावर विकिरण प्रक्रिया होऊन अमेरिकेपाठोपाठ गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ऑस्ट्रेलियाला आंब्यांची निर्यात झाली आहे. मंगळवारपर्यंत (ता. ९) ४१ हजार बॉक्समधून १४० टन आंबा हा अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाला निर्यात झाला आहे.

भारतीय आंब्याला चांगल्या चवीमुळे संपूर्ण जगातून पसंती असते. जगभरातील खवय्यांना भुरळ घालणाऱ्या कोकणच्या हापूस आंब्याची परदेशवारीही यंदाही लासलगावमार्गे झाली आहे.

गेल्या पंधरा वर्षांपासून अमेरिकेने ठरवून दिलेल्या मापदंडाचे काटेकोर पालन होत असल्याने भारतीय हापूस आंब्याची मोठ्या झपाट्याने अमेरिका, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि मलेशियात निर्यात होत आहे.

लासलगाव येथील भाभा अणू संशोधन केंद्रातून अल्फान्सो, केसर, बदाम, राजापूर, मल्लिका, हिमायत, हापूस जातीच्या या आंब्यांवर विकिरण प्रक्रिया करून त्याची निर्यात केली जाते.

मागील वर्षी एक हजार टन हापूस आंब्यांची निर्यात ‘कृषक’मधून केली होती. यावर्षी मुंबई एअरलाइन्सला बुकिंग मिळण्यास उशीर होत आहे. बंगलोर, हैदराबाद एअरलाइन्समुळे खर्च वाढतो.
- संजय आहेर, विकिरण सुरक्षा अधिकारी, कृषक, लासलगाव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack: बिबट्याला ठार करा, शेतकरी संतप्त

Cotton Purchase Limit: हमीभावाने कापूस खरेदीची मर्यादा हटवावी

Cotton Cultivation: मजूर समस्येमुळे तमिळनाडूत कापूस लागवड क्षेत्र घटले

Agriculture Services: ‘बहुउद्देशीय’साठी सोसायट्यांना किमान कृषी सेवांचे बंधन

Sugar Market: साखर बाजारात सावध वातावरण

SCROLL FOR NEXT