Export-Supplementary Projects Agrowon
ॲग्रो विशेष

Export-Supplementary Projects : संत्रा पट्ट्यात वाढत आहेत निर्यातपूरक प्रकल्प

Project Update : संत्र्याची टिकवण क्षमता वाढावी याकरिता ग्रेडिंग आणि त्यावर वॅक्‍स कोटिंगची प्रक्रिया केली जाते. सुरुवातीला मर्यादित संख्येत असलेल्या या प्रकल्पांची संख्या नजीकच्या काळात सुमारे १६ पेक्षा अधिक झाली आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Amaravati News : संत्र्याची टिकवण क्षमता वाढावी याकरिता ग्रेडिंग आणि त्यावर वॅक्‍स कोटिंगची प्रक्रिया केली जाते. सुरुवातीला मर्यादित संख्येत असलेल्या या प्रकल्पांची संख्या नजीकच्या काळात सुमारे १६ पेक्षा अधिक झाली आहे. आता या प्रकल्पांमध्ये श्रमजीवी नागपूर संत्रा उत्पादक कंपनी लि.च्या नव्या प्रकल्पाची देखील भर पडली आहे. तब्बल तीन कोटी रुपयांतून या प्रकल्पाची उभारणी होत आहे.

चव आणि रंगसंगतीच्या बाबतीत नागपुरी संत्र्याने जागतिकस्तरावर वेगळेपण जपले आहे. परंतु केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्थेच्या निष्क्रियतेमुळे या फळपिकात अपेक्षित संशोधन झाले नाही. परिणामी, उत्पादकता व उत्पन्नाच्या बाबतीत हे फळपीक काहीसे माघारले आहे. नजीकच्या काळात त्यावर कीड-रोगांचा प्रादुर्भावही वाढता आहे. त्यावरही उपाय शोधण्यात संस्था अपयशी ठरली आहे.

विदर्भातील शेतकऱ्यांसाठी हे मुख्य फळपीक असल्याने त्यांच्यास्तरावर मात्र ग्रेडिंग, कोटिंग, प्रीकूलिंग यांसारख्या पर्यायातून हे पीक वाचविण्याचा प्रयत्न होत आहे. सुरुवातीला अवघ्या २-३ अशा प्रमाणात असलेल्या अशा युनिटची संख्या आजच्या घडीला २१ पेक्षा अधिक झाली आहे.

वॅक्‍स कोटिंगमुळे आठ दिवसांची टिकवण क्षमता १५ दिवसांवर पोहोचते. त्यासोबतच फळाची चकाकी वाढत असल्याने त्याला बाजारात ग्राहकांची मागणी राहते, असे वरुड येथील श्रमजीवी नागपूर संत्रा उत्पादक कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश जिचकार यांनी सांगितले.

...अशी आहे क्षमता

वरुड येथील श्रमजीवी नागपूर संत्रा उत्पादक कंपनीकडून प्रस्तावित ग्रेडिंग कोटिंग युनिटची क्षमता पाच टन प्रति तास अशी आहे तर प्रीकूलिंग चेंबरची क्षमता प्रति तास आठ टन अशी आहे. ३ कोटी ३१ लाख रुपयांचा हा प्रकल्प आहे. स्मार्ट प्रकल्पातून अनुदानावर त्याची उभारणी होत असून, त्याकरिता ३० वर्षांच्या भाडेतत्त्वावर जागा घेण्यात आली आहे.

संत्रा निर्यातीकरिता दुबई २२, तर शांघाय २७ दिवस लागतात. त्यासाठी रेफर कंटेनरची गरज राहते. याकरिता कोल्डचेन विकसित करावी लागते. अशावेळी सुरुवातीच्या टप्प्यात प्रीकूलिंग करावे लागते. बांगलादेशला तीन- चार दिवसांत निर्यात शक्‍य होत असल्याने प्रीकूलिंगची गरज नाहीत. आमच्या शेतकरी उत्पादक कंपनीने ग्रेडिंग-कोटिंगसह निर्यातीच्या अनुषंगाने प्रीकूलिंग यंत्रणा उभारण्याचे काम होती घेतले आहे.
रमेश जिचकार, मुख्य कार्यकारी अधिकारी, श्रमजीवी नागपूर संत्रा उत्पादक कंपनी, वरुड, अमरावती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: राज्यात आणखी २ दिवस मुसळधारेचा अंदाज; कोकण, घाटमाथ्यावर अतिजोरदार पावसाची शक्यता

Cage Fish Farming : शेततळ्यात पिंजरा पद्धतीने शाश्वत मत्स्यशेती करणे शक्य

Ujani Dam Pollution : उजनी प्रदूषणाबाबत केंद्र सकारात्मक, राज्य शासन उदासीन

Nandurbar Rain : तळोद्यात दमदार पावसाने पिकांना दिलासा

Agricultural Packaging: पर्यावरणपूरक पॅकेजिंगचा वाढेल वापर

SCROLL FOR NEXT