Fig Juice Export Agrowon
ॲग्रो विशेष

Fig Juice Export : पुरंदर ‘हायलॅण्ड्‍स’कडून अंजीर ज्यूसची पोलंड येथे निर्यात

Fig Processing : पुरंदरच्या भौगोलिक निर्देशांक मिळालेल्या अंजिराच्या ज्यूसची पोलंड देशात पहिल्यांदाच निर्यात करण्याच्या प्रयत्नांना शेतकऱ्यांना यश आले आहे.

Team Agrowon

Pune News : पुरंदरच्या भौगोलिक निर्देशांक मिळालेल्या अंजिराच्या ज्यूसची पोलंड देशात पहिल्यांदाच निर्यात करण्याच्या प्रयत्नांना शेतकऱ्यांना यश आले आहे. पुरंदर हायलॅण्ड्‍स शेतकरी उत्पादक कंपनीच्या वतीने ही निर्यात करण्यात आली असून, पोलंडच्या बाजारपेठेतील ग्राहकांचे अनुभव पाहून पुढील निर्यातवृद्धी होण्याचा विश्‍वास शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष रोहन उरसळ यांनी सांगितले.

पुरंदर तालुक्यातील अंजीर उत्पादक शेतकऱ्यांना विविध निर्यातक्षम वाण उपलब्ध व्हावे, अंजिराला परदेशी बाजारपेठ मिळावी म्हणून शेतकऱ्यांनी पुरंदर हायलॅण्ड्‍स शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना केली.

कंपनीच्या माध्यमातून लागवड ते निर्यात अशा सर्व पातळीवर व्यवस्थापन तज्ज्ञांच्या माध्यमातून केले जाते. यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते. मात्र केवळ उत्पादन न करता, मूल्यवर्धनासाठी प्रक्रियादेखील महत्त्वाची आहे. या उद्देशाने गेल्या तीन-चार वर्षांच्या प्रयत्नांमधून अंजीर ज्यूसची निर्मिती करण्यात आल्याचे उरसळ यांनी सांगितले.

अंजीर ज्यूसचे उत्पादन घेताना, प्राथमिक पातळीवर काही चाचण्या घेऊन, उत्पादन सुरू केले. या ज्यूसची स्थानिक पातळीवरील ग्राहकांकडून प्रतिसाद घेतल्यानंतर ज्यूस पुणे, मुंबई येथील ग्राहकांना पाठविण्यात आला.

यानंतर काही निर्यातदारांशी चर्चा करून, पोलंड येथे काही बाटल्या पाठविण्यात आल्या होत्या. त्याचे सकारात्मक परिणाम आल्यानंतर निर्यातदार सीऑन यांच्या सहकार्याने २०० मिलिमीटरच्या १ हजार १०० बॉटल निर्यात करण्यात आल्या. पोलंड येथे एमजी सेल्स हे वितरक असून, ते त्यांच्या लेबलने तिथे ज्यूसची विक्री करणार आहेत, असे उरसळ यांनी सांगितले.

अंजीर ज्यूससह, जांभूळ, पेरू ज्यूसचा समावेश

अंजीर ज्यूससह जांभूळ आणि पेरूचा ज्यूस देखील चाचणीसाठी पाठविण्यात आला आहे. जांभूळ आणि पेरू ज्यूसची चव स्थानिक ग्राहकांना आवडल्यानंतर त्यांच्या प्रतिक्रियेनंतर निर्यात वाढविणार असल्याचे उरसळ यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought Relief: शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार जमा होण्यास सुरुवात, जयकुमार गोरेंची माहिती

Nagpur Agriculture : नागपुरात कृषी विभागाचा कारभार रामभरोसे; पदे रिक्त असल्याने योजनांच्या अंमलबजावणीला ब्रेक!

Karjmafi Glitches : शेतकऱ्यांची कोंडी: सरकारच्या तांत्रिक चक्रव्यूहात अखेरची कर्जमुक्ती योजना अडकली!

November Rain: नोव्हेंबरमध्ये एमजेओमुळे पावसाचे प्रमाण वाढणार आहे का ?

Scheme Glitches : सातारा जिल्ह्यात शासकीय योजनांच्या त्रुटींचा जाच; लाभाऐवजी शेतकऱ्यांनाच सहन करावा लागतोय मनस्ताप!

SCROLL FOR NEXT