Indian Farmer Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Season : रब्बी हंगामाकडून शेतकऱ्यांना अपेक्षा

Rabi Farming : बारामती तालुक्यामध्ये पावसाची समाधानकारक स्थिती, पाण्याची उपलब्धता यामुळे रब्बी पेरण्यांना सुरुवात झाली आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी रब्बी हंगाम साधणार आहे.

Team Agrowon

Pune News : बारामती तालुक्यामध्ये पावसाची समाधानकारक स्थिती, पाण्याची उपलब्धता यामुळे रब्बी पेरण्यांना सुरुवात झाली आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी रब्बी हंगाम साधणार आहे. मागील वर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे रब्बी हंगाम वाया गेला होता. खास करून बारामती जिरायती भागामध्ये यंदा पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे यंदा उत्पादन वाढण्याची आशा शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.

मागील वर्षी रब्बी हंगामातील बहुतांश पिकांचा पेरणी कालावधी संपत आला तरीही रब्बीची पेरणी सरासरीच्या जवळ गेलेली नव्हती. जिल्ह्यात डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत सरासरीच्या केवळ ६२ टक्केच पेरणी पेरण्या झाल्या होत्या. कमी पावसाचा खरीप हंगामा बरोबरच रब्बीला देखील फटका बसला होता. त्यात वातावरण बदलामुळे व अवकाळी पावसामुळे देखील रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले होते.

रब्बीचे जिल्ह्यात २ लाख २९ हजार ५१६ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. त्यापैकी मागील वर्षी १ लाख ४१ हजार ७०२ हेक्टरवर पेरणी झाली होती. रब्बीत सर्वाधिक ज्वारीचे सरासरी १ लाख ३४ हजार ३३६ हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी केवळ ८१ हजार २७३ हेक्टरवर पेरणी झाली. यंदाच्या वर्षी मात्र पावसाची स्थिती समाधानकारक आहे. बंधारे, पाझर तलाव, विहिरी, विंधन विहिरी आदींना देखील पाण्याची उपलब्धता आहे.

परिणामी यांना रब्बीचे क्षेत्र सरासरीच्या पुढे जाईल. बारामती तालुक्यामध्ये आतापर्यंत रब्बी ज्वारीच्या ७०२ हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. तर मका पिकाच्या २५८ हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. त्याचबरोबर चारा पिकांच्या ६२८ हेक्टर वर तर कांद्याच्या ५३ हेक्टरवर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत, असे तालुका कृषी अधिकारी सुप्रिया बांदल यांनी सांगितले.

यंदा गहू, ज्वारीच्या क्षेत्रात होणार वाढ

मागील वर्षाच्या रब्बी हंगामामध्ये गहू आणि ज्वारीचे क्षेत्र कमालीचे घटले होते. ज्वारीच्या काही प्रमाणात पेरण्या झाल्या असल्या तरी अवकाळी पावसामुळे ते क्षेत्र वाया गेले. यंदा मात्र ज्वारी व गव्हाच्या क्षेत्रामध्ये लक्षणीय वाढ होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

बारामती तालुक्यातील रब्बी पिकांचे सरासरी क्षेत्र ( हेक्टर मध्ये )

पीक सरासरी क्षेत्र

ज्वारी २९,५४४

गहू ६,४४८

मका २,७२४

हरभरा ६,३७३

गळीतधान्य ९४.२४

कांदा ४,०००

ऊस लागण ४,९६१

फुल पिके २००

फळपिके २००

भाजीपाला १,५०४

चारा पिके ५,०००

मसाला पिके १००

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार ; टोमॅटो दर टिकून, केळीला मागणी, आल्याला उठाव तर गवारची आवक टिकून

Sugarcane FRP Dues: थकीत 'एफआरपी'प्रश्नी ८१ साखर कारखान्यांना नोटिसा, सहकारमंत्री बाबासाहेब पाटलांची विधानपरिषदेत माहिती

Cotton Productivity Mission: कापूस उत्पादकता अभियान फसण्याचे संकेत

Rain Update In Maharashtra: कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील ६ जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज 

Crop Insurance: पीकविमा योजनेत शेतकऱ्यांना वेळेत नुकसान भरपाई मिळेना; कृषिमंत्र्यांची कबुली

SCROLL FOR NEXT