Sugarcane Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane FRP : ऊस उत्पादकांना ‘एफआरपी’बाबत अपेक्षा

Team Agrowon

Nandurbar News : जिल्ह्यात अनेक गावांतील असंख्य शेतकऱ्यांनी या वर्षीदेखील मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड केली आहे. पण गेल्या पाच वर्षांपासून खांडसरी तसेच कारखाने यांच्याकडून उसाला योग्य तो हमीभाव मिळत नसून, यंदा दर उत्पादन खर्चानुसार किंवा साडेतीन हजार रुपये प्रतिटन एवढा मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

ऊस हे बारमाही पीक असून, त्याला मोठ्या प्रमाणात खत, उसाचे महागडे बियाणे, लागवडीचा खर्च, निंदणी, ठिंबक सिंचन आदी खर्च येतो. त्यातच सर्वच क्षेत्रांमध्ये महागाई वाढलेली असून, याचा फटका शेतकऱ्यांनासुद्धा सहन करावा लागत आहे. रासायनिक खतांचे दर वाढले आहेत.

एक हजार ५० रुपयांना मिळणारी बॅग आता एक हजार ७०० ते एक हजार ८०० रुपयांवर जाऊन पोहोचलेली आहे. त्यातच डिझेल, पेट्रोलचे दर वाढल्याने मशागतीचा खर्चदेखील दीड पटीने वाढला आहे. रासायनिक औषधांची तीच तऱ्हा आहे. असे असताना उसाला मिळणारा दर मात्र गेली कित्येक वर्षे एकाच जागेवरच अडकून पडला आहे.

लहरी हवामान, अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण आदी नैसर्गिक घटक शेतकरी बांधवांच्या अडचणीत वाढ करीत असतात. त्यातच शेतकऱ्यांनी भरपूर मेहनत घेऊन पिकविलेल्या शेतीमालास योग्य हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी पूर्णपणे भरडला जात आहे. मात्र तरीदेखील शेतकरी बांधव न खचता मोठ्या आशेने व जोमाने शेतात राबत असतो. गळीत हंगाम सुरू आहे.

मागील पाच ते सात वर्षांपासून उसाचा दर १६५० ते २५५० यातच अडकला आहे. मात्र मागील पाच ते सात वर्षांच्या तुलनेत ऊस उत्पादनाचा भांडवली खर्च कितीतरी पटीने वाढला आहे. याचाही डोळसपणे विचार आणि अभ्यास होणे आवश्यक असल्याचे मत ऊस उत्पादक शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. एफआरपीच्या नावाखाली उसाला योग्य तो हमीभाव मिळत नाही.

जिल्ह्यात १२ हेक्टरवर ऊस पीक...

पुढील महिन्यात ऊस गाळप हंगाम जिल्ह्यात सुरू होणार आहे. त्याची तयारी प्रमुख कारखान्यांनी सुरू केली आहे. यात जिल्ह्यात यंदाही सुमारे १२ हजार ५०० हेक्टरवर ऊस पीक आहे. शहादा तालुक्यात अधिकची लागवड झाली आहे. चांगले उत्पन्न देणारे पीक म्हणून उसाची लागवड आपापल्या शेतात करीत असतात. पपई, केळी आदी पिकांना पर्याय म्हणून तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांकडून उसाला प्राधान्य देण्यात येते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Harvesting : सोयाबीनची उंची वाढली, उत्पन्न कमीच

Irrigation Subsidy : सिंचन अनुदान रखडल्याने आर्थिक संकट

Farmers Issue : कृषी विभागाचे नियंत्रण नसल्याने शेतकरी नडला जातोय

Sangli APMC : व्यापारी, हमाल वादावर तोडगा काढण्यासाठी समिती

Nuksan Bharpai : १८ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अवकाळी व अतिवृष्टिचा मदत निधी

SCROLL FOR NEXT