Sugarcane FRP : ‘भीमाशंकर’चा ३२०० रुपये दर जाहीर

Sugarcane Season : याशिवाय १.८३ लाख मेट्रिक टन खोडवा उसासाठी १०० रुपये प्रती मेट्रिक टनाप्रमाणे रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अदा केली आहे.
Sugarcane FRP
Sugarcane FRPAgrowon
Published on
Updated on

Pune News : येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाला जास्तीचा दर देण्याची परंपरा कायम राखत मागील वर्षी २०२३-२४ गाळप हंगामात गाळप केलेल्या उसासाठी अंतिम ऊस दर प्रती मेट्रिक टनासाठी ३,२०० रुपये जाहीर केला असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिली.

भीमाशंकर कारखान्याचे संस्थापक-संचालक व राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार सन २०२३-२४ गाळप हंगामात कार्यक्षेत्र व परिसरातील गाळप केलेल्या संपूर्ण ११ लाख नऊ हजार ४६८ मेट्रिक टन उसासाठी कारखान्याने एफआरपीनुसार २७९०.१० रुपये प्रति मेट्रिक टन दर येत असतानाही यापूर्वी २,९५० रुपये प्रति मेट्रिक टनाप्रमाणे रक्कम एकूण रक्कम ३२७ कोटी २९ लाख ३० हजार रुपये एकरक्कमी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अदा केलेली आहे.

Sugarcane FRP
Sugarcane Bill : थकित ऊसबिलांसाठी ‘स्वाभिमानी’चे धरणे

याशिवाय १.८३ लाख मेट्रिक टन खोडवा उसासाठी १०० रुपये प्रती मेट्रिक टनाप्रमाणे रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अदा केली आहे. ऊस तोडणी व वाहतूक दरामध्ये झालेल्या वाढीमुळे ऊस तोडणी व वाहतूक खर्चात १३७ रुपये प्रती मेट्रिक टन वाढ होऊनही ३२०० रुपये प्रती मेट्रिक टन अंतिम ऊस दर जाहीर केलेला आहे. अंतिम हप्ताची रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे बँक खात्यावर दिवाळी सणापूर्वी वर्ग करण्यात येणार आहे.

Sugarcane FRP
Sugarcane Farming : अभ्यासूवृत्तीने वाढवली उसाची उत्पादकता

कारखान्याने यापूर्वी एफआरपीपेक्षा जास्त दर व खोडवा अनुदान वेळेतच अदा केलेले आहे. त्याशिवाय एफआरपीपेक्षा जास्त दर अदा केलेला असूनही दर वर्षीप्रमाणे दिवाळीसाठी अंतिम हप्त्याच्या स्वरूपात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अदा करण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.

भीमाशंकर कारखान्याने नेहमीच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीचा दर दिलेला असून यापुढेही ही परंपरा कायम राहील. तरी गाळप हंगाम २०२४-२५ साठी कार्यक्षेत्र व परिसरातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी भीमाशंकर कारखान्यास आपला ऊस देऊन पूर्वीप्रमाणेच सहकार्याची भावना ठेवावी, अशी विनंती कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com