Monsoon Rain  agrowon
ॲग्रो विशेष

Monsoon Rain : नंदुरबारात जोरदार पावसाची प्रतीक्षा

Rain Update : खानदेशात हवा तसा पाऊस आलेला नाही. वळवाचा पाऊस काही भागात होता.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात हवा तसा पाऊस आलेला नाही. वळवाचा पाऊस काही भागात होता. परंतु नंदुरबारातील कमाल क्षेत्रात पेरणीयोग्य किंवा समाधानकारक पाऊस नसल्याने पेरण्या सुरू झालेल्या नाहीत. अन्य भागातही ऊन-सावली अशी स्थिती मागील दोन दिवस आहे.

नंदुरबार जिल्ह्यात वळवाचा पाऊस झाला. मध्यंतरी मोसमी पाऊस दाखल होऊन जोरदार पाऊस येईल, अशी अपेक्षा होती. परंतु जिल्ह्यात काही भागांचा अपवाद वगळता चांगला पाऊस झालेला नाही. तापी नदीकाठी शहादा, तळोदा व नंदुरबार तालुक्यात चांगला पाऊस आलेला नाही. धुळ्यातील शिरपुरातही हवा तसा पाऊस नसल्याने अडचणी आहेत. यामुळे पेरण्या रखडत सुरू आहेत.

काही शेतकरी तूर, उडीद, मूग आदींची पेरणी करीत आहेत. परंतु कोरडवाहू कापूस, सोयाबीन आदींची पेरणी शेतकरी सध्या करीत नसल्याची स्थिती आहे. चांगला पाऊस आल्यानंतरच पेरणीला नंदुरबारात सुरवात होईल, असे दिसत आहे.

धुळे जिल्ह्यातही शिरपूर, शिंदखेडा भागात पाऊस कमी आहे. धुळे,साक्री भागात पाऊस झाला आहे. परंतु या भागातही सर्वत्र जोरदार पाऊस झालेला नाही. काही भागात जोरदार तर काही भागात तुरळक पाऊस झाला आहे.

शेतकऱ्यांची धावपळ, आता प्रतीक्षा

सात ते आठ दिवसांपूर्वी पाऊस जोरदार येईल, शेताची मशागत, पेरणीला वेळ मिळणार नाही, या भीतीने शेतकऱ्यांनी पूर्वमशागतीला वेग दिला. रात्रंदिवस शेतांत ट्रॅक्टरने मशागत सुरू असल्याचे दिसत होते. मशागतीसाठी ट्रॅक्टर उपलब्ध होत नव्हते. अन्य भागातून ट्रॅक्टर आणून शेतकऱ्यांना मशागत करून घ्यावी लागली.

लागलीच पाऊस येईल व पेरण्या होतील. पेरण्या यशस्वी होतील, अशीही अपेक्षा होती. परंतु पाऊस जोरदार बरसला नाही. पाऊस न आल्याने शहादा, तळोदा, नंदुरबार भागात पेरण्याही सुरू झालेल्या नाहीत. जिल्ह्यात फक्त पूर्वहंगामी किंवा बागायती कापसाची लागवड झाली आहे. तीदेखील अल्प किंवा सुमारे 24 हजार हेक्टरवर झाली आहे.

पेरणीची टक्केवारी संथ

मागील हंगामातही जून व ऑगस्टमध्ये पावसाने ओढ दिली होती. यंदाही काही भागात कमी व काही भागात बरा पाऊस झाला आहे. तर काही भागात तुरळक, अत्यल्प पाऊस झाला आहे. यामुळे पेरण्यांना गती आलेली नाही. परिणामी पेरणीची टक्केवारी संथ गतीने वाढत आहे. उडीद, मूग, तूर आदी पिकांची पेरणी या महिन्यात होणे अपेक्षित असते. परंतु जून महिना अर्धा संपला तरीदेखील उडीद, मूग, तूर आदी पिकांची पेरणी हवी तशी झालेली नाही. यामुळे कडधान्य पिकांची पेरणी किती क्षेत्रात होईल, याबाबत अंदाज बांधणे सध्या अशक्य झाले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Non Traditional Crops: विदर्भ-मराठवाड्यात अपारंपरिक पीके वाढणे आवश्यक: डॉ. गडाख

Forest Fire Prevention: वणवे लावणाऱ्यांवर कठोर कारवाईसाठी कायद्यात दुरुस्ती

Land Acquisition Compensation: प्रलंबित प्रकरणे दोन महिन्यांत निकाली

Dr Jaysingrao Pawar Passes Away: मराठेशाहीचा इतिहासकार हरपला, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन

Agriculture Advice: अडचणींना घाबरू नका, शेतीत सतत ज्ञानार्जन करा

SCROLL FOR NEXT