Excise Department  Agrowon
ॲग्रो विशेष

Excise Department : सोलापुरात उत्पादन शुल्क विभाग महाराष्ट्र-कर्नाटकची समन्वय बैठक

Team Agrowon

Solapur News : राज्य विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच जाहीर केला असून, त्याअनुषंगाने सोलापूर जिल्ह्यास कर्नाटक राज्याची सीमा लगत असल्याने सोलापुरात राज्य उत्पादन शुल्क पुणे विभाग आणि कर्नाटकातील विजगयपुरा विभागाचे उपायुक्त कार्यालय अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक नुकतीच झाली.

पुणे विभागीय उप-आयुक्त सागर धोमकर यांचे अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. जिल्ह्याच्या राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक श्रीमती भाग्यश्री जाधव कर्नाटक राज्यातील विजयपुराचे उत्पादन शुल्क विभागाचे उपायुक्त डॉ. संगनगौडा होसळ्ळी व कलबुर्गी जिल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक हनमंतराय वज्रमड्डी, उपअधीक्षक दोडाप्पा हेबळे तसेच सोलापुर जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उप अधीक्षक एस. आर. पाटील, जे. एन. पाटील आदी या वेळी उपस्थित होते.

या बैठकीमध्ये उप आयुक्त धोमकर यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व अधिकारी व कर्मचारी यांचेशी सविस्तर चर्चा करून सोलापूर जिल्ह्यास कर्नाटक राज्याची सीमा लगत असल्याने निवडणूक कालावधीमध्ये कर्नाटक राज्यातून कोणत्याही प्रकारे दारूची अवैध वाहतूक, विक्री, निर्मिती होणार नाही.

याबाबत प्रतिबंध करण्याकरिता दोन्ही राज्यातील उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांनी परस्परांत समन्वय ठेवून दोन्ही राज्यात सीमावर्ती भागातील चेकपोस्ट द्वारे आंतरराज्य माल वाहतूक व प्रवासी वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांची अत्यंत सुक्ष्मपणे तपासणी करावी व कसून चौकशी करून एकाहो वाहनातून अवैध दारू तस्करी होणार नाही, याची खबरदारी घ्यावी.

सीमावर्ती भागामध्ये दोन्ही राज्यांच्या राज्य उत्पादन शुल्क विभागांनी अवैध दारू तस्करी करणा-याच्या माहितीचे संकलन करून परस्परांना द्यावी. सीमावर्ती भागामध्ये सामुहिक मोहिमा राबविणे, अवैध दारू साठवणूक ठिकाणे व हातभट्टी ठिकाणांची गोपनीय माहिती काढून त्यावर कारवाई करणे, सीमेवरील दारू दुकानांच्या दारू विक्री व्यवहारांवर कठोर नियंत्रण ठेवावे अशा सूचना विभागीय उपआयुक्त धोमकर यांनी दिल्या.

माहिती द्या, नावे गुप्त ठेवू

अवैध मद्यविक्री, अवैध धंदे व वाहतूकी विरोधात कारवाई यापुढेही चालु राहणार असून, अवैध मद्याबाबत माहिती असल्यास टोल फ्री-१८००२३३९९९९ क्रमांक अथवा व्हॉटस अॅप क्रमांक ८४२२००११३३ या क्रमांकावर माहिती द्यावी, संबंधितांचे नाव गुप्त ठेवले जाईल, असे राज्य उत्पादन शुल्क सोलापूरच्या अधीक्षक श्रीमती भाग्यश्री जाधव यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MSP Procurement : शिराढोणला सोयाबीन हमीभाव केंद्र सुरू होणार

Crop Damage : ‘ओझरखेड’च्या आवर्तनाने पिके पाण्याखाली

Crop Damage : पावसामुळे सोयाबीनसह तुरीचे पीक पाण्यात

Soil Erosion : जमिनीची धूप थांबविली तरच भविष्यात शाश्‍वत उत्पादन

Soybean Harvesting : सोयाबीन कापणीला एकरी सहा हजारांचा खर्च

SCROLL FOR NEXT