Soil Excavation Agrowon
ॲग्रो विशेष

Soil Excavation : सुधागडमध्ये मातीचे उत्खनन

Soil Excavation Update : काही महिन्यांपासून सुधागड तालुक्यात माती चोरणाऱ्यांचा सुळसुळाट झाला आहे. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या माती उत्खनन होत आहे.

Team Agrowon

Pali News : काही महिन्यांपासून सुधागड तालुक्यात माती चोरणाऱ्यांचा सुळसुळाट झाला आहे. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या माती उत्खनन होत आहे. नाममात्र स्वामित्वधन (रॉयल्टी) काढून हजारो रुपयांचा महसूल बुडविला जात आहे. याबाबत तहसीलदार व मंडळ अधिकारी तलाठी यांच्या निदर्शनास आणूनदेखील याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्‍याने ग्रामस्‍थांकडून नाराजी व्‍यक्‍त केली जात आहे.

जिल्ह्यासह तालुक्‍यामध्ये मोठ्या प्रमाणावर गृहप्रकल्‍प उभारले जात आहेत. यासाठी माती तसेच रेतीच तुटवडा असल्‍याने येथील नदीपात्रासह अनेक ठिकाणीची माती चोरून विक्री केली जात आहे. यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडविला जात आहे. तालुक्‍यातील जांभूळपाडा हरणेरी येथील एका विकसकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाचा वापर करून मोठ्या प्रमाणात माती उत्खनन करून हजारो रुपयांचा महसूल बुडविला आहे.

तसेच ढोकशेत येथील काही विकसकांकडूनदेखील मोठ्या प्रमाणात माती आणि डबर उत्खनन केले जात आहे. त्याचबरोबर दुधनी गावच्या हद्दीतदेखील मोठ्या प्रमाणात माती उत्खनन होत असून तेथील माती पनवेल, अलिबाग व अन्य ठिकाणी वाहतूक केली जात आहे. या माती उत्खननाचे महसूल कार्यालयातून रॉयल्टी चलन काढले जाते. मात्र, चलनावर किती ब्रास माती उत्खनन करणार आहे, याची नोंद नसून केवळ रक्‍कमच दाखवली जाते. यातून शासनाचा महसूल बुडत असल्‍याचा आरोप ग्रामस्‍थ करित आहेत.

सुधागड तालुक्यात ज्या ज्या सजामध्ये माती व डबर उत्खनन झाले असेल त्यांची चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल. माती उत्खनन करणारे जे व्यावसायिक असतील त्यांनी रॉयल्टीविना माती उत्खनन केल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून माती चोरीचे गुन्हे दाखल करण्यात येतील.
संदेश शिर्के, उपजिल्हाधिकारी, रायगड.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Management: अवकाळी पावसानं भातशेती संकटात; 'या' उपाययोजना केल्यानं उत्पादनातील घट टाळता येईल

CM Devendra Fadnavis: देशाच्या सागरी शक्तीमध्ये महाराष्ट्राचे मोठे योगदान: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Sugarcane Season : मराठवाड्यात नॅचरल शुगर उच्चांकी ऊसदर देणार

Cotton MSP Procurement: ओलाव्यात अडकली कापुस खरेदी; ओलावा जास्त असल्याने कमी भावात कापुस विकण्याची वेळ

Stubble Burning: पिकांचे अवशेष जाळणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाई; हमीभावावर पिकांची विक्री करता येणार नाही

SCROLL FOR NEXT