Crop Insurance Fraud Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : प्रत्येक पात्र शेतकऱ्याला पीकविम्याची भरपाई त्वरित मिळावी ः जिल्हाधिकारी

Crop Insurance Compensation : २०२३-२४ हंगामातील पीकविमा योजनेतील तक्रारी त्वरित निकाली काढाव्यात तसेच अपात्र दाखवण्यात आलेल्या प्रकरणाची तपासणी करून योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिल्या.

Team Agrowon

Akola News : पीकविमा योजनेतील प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई त्वरित मिळावी, हाच पीकविमा योजनेचा हेतू असून पीकविमा प्रकरणांमध्ये ज्या ठिकाणी २५ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे, अशा ठिकाणी सरासरीनुसार नुकसान भरपाई देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले.

नियोजन भवनात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या वेळी आमदार अमोल मिटकरी, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, कृषी अधिक्षक अधिकारी शंकर किरवे, मूर्तिजापूर उपविभागीय अधिकारी संदीप पवार, तहसीलदार शिल्पा बोबडे आदी उपस्थित होते.

२०२३-२४ हंगामातील पीकविमा योजनेतील तक्रारी त्वरित निकाली काढाव्यात तसेच अपात्र दाखवण्यात आलेल्या प्रकरणाची तपासणी करून योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिल्या.

यावेळी आ. पिंपळे यांनी मूर्तिजापूर, बार्शीटाकळी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पीकविमा योजने संदर्भातील अडचणी मांडत पीकविमा प्रतिनिधींनी तपासणी करून त्वरित अडचणी सोडवण्याच्या सूचना दिल्या.

तर आ. भारसाकळे यांनी पीकविमा योजना ही शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण असून एकही पात्र शेतकरी त्यापासून वंचित राहू नये याबाबत विमा प्रतिनिधींना निर्देश दिले. आ. मिटकरी यांनी शासनाच्या योजना अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून कार्य करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी पीक विमा प्रतिनिधी, कृषी विभागाचे अधिकारी तथा शेतकरी आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

E-Peek Pahani: शेतकऱ्यांचं टेन्शन मिटलं! ई- पीक पाहणी प्रक्रियेत मोठा बदल, सहायकांची नियुक्ती, शासन निर्णय जारी

Farmer Fraud: शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करा

Pikvima Scam: पीकविमा अर्जासाठी सीएससी चालकांकडून शेतकऱ्यांची लूट

Dairy Farming: नवतंत्रज्ञानातून दुग्ध उत्पादनात वाढ शक्य

Pik Vima Dharashiv: गतवर्षीच्या खरिपातील पीकविम्याचा मार्ग मोकळा

SCROLL FOR NEXT