Agriculture Crop Insurance : नांदेडला पीकविमा योजनेत ११.१५ लाख अर्ज दाखल

Crop Insurance Update : नांदेड जिल्ह्यात यंदा ११ लाख १४ हजार ८७६ अर्जदार शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेत सहभाग घेतला आहे.
Crop Insurance Compensation
Crop Insurance CompensationAgrowon
Published on
Updated on

Nanded News : नांदेड जिल्ह्यात यंदा ११ लाख १४ हजार ८७६ अर्जदार शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेत सहभाग घेतला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा सात टक्के अर्ज कमी दाखल झाले आहेत. सहा पिकांसाठी तब्बल दहा लाख ५९ हजार ५०९ अर्ज दाखल झाले आहेत. यात शेतकऱ्यांनी ६८ कोटी ५५ लाख रुपयांचा विमा हप्ता भरल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

जिल्ह्यात खरीप हंगाम २०२४ मध्ये पंतप्रधान खरीप पीकविमा योजना युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनीद्वारे राबविण्यात आली. या योजनेअंतर्गत अर्जदार शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात पीकविमा योजनेत सहभागी होता आले. यात ज्वारी, सोयाबीन, कापूस, तूर, उडीद व मूग या पिकासाठी पीकविमा भरण्याची सुविधा १६ जूनपासून सुरू झाली.

Crop Insurance Compensation
Fruit Crop Insurance : सहा हजार केळी विमाधारकांच्या परताव्याचा प्रश्‍न प्रलंबित

तर सहभागाची अंतिम मुदत १५ जुलै अशी निश्‍चित करण्यात आली होती. योजनेत सहभागासाठी पुरेसा कालावधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने खरीप हंगाम ऑनलाइन विमा भरण्यास ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.

Crop Insurance Compensation
Agriculture Crop Insurance : निम्मेच शेतीक्षेत्र विमा संरक्षित

यंदा शेतकऱ्यांनी विमा भरण्यासाठी अंतिम तारखेची वाट न पाहत वेळेवर विमा भरण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले होते. दरम्यान मागील वर्षी जिल्ह्यात ११ लाख ९८ हजार ९८० अर्ज दाखल झाले होते. यंदा सहा पिकांसाठी ११ लाख १४ हजार ८७६ अर्ज दाखल झाले आहेत.

यंदाच्या पीकविमा योजनेची वैशिष्ट्ये

मागील वर्षी सहभागी अर्जदार ११,९८,९८०

यंदा सहभागी अर्जदार शेतकरी ११,१४,८७६

शेतकऱ्यांनी भरलेला विमा हप्ता ११,१४,८५०

केंद्र सरकारचा विमा हप्ता ३०० कोटी २७ लाख

राज्य सरकारचा विमा हप्ता ३९१ कोटी ३३ लाख

जिल्ह्यातील विमा संरक्षित क्षेत्र ७,५६,३६० हेक्टर

एकूण विमा संरक्षित रक्कम ४,०४८ कोटी रुपये

एकूण विमा हप्ता जमा ६९१ कोटी ७२ लाख रुपये

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com