Dhananjay Mahadik  Agrowon
ॲग्रो विशेष

Dhananjay Mahadik : 'लाडकी बहीण'वरून दम देण्याऱ्या महाडिक यांच्याकडून दिलगिरी; त्यात ही वोट जिहादचा उल्लेख

Dhananjay Mahadik Kolhapur BJP : महाराष्ट्राच्या निवडणुकीत 'लाडकी बहीण योजना' प्रचाराचा केंद्रबिंदू ठरली असतानाच कोल्हापुरात मात्र भाजप खासदाराने वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. यावरून आता टीकेची झोड उठली आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : विधानसभा निवडणुकीत 'लाडकी बहीण योजना' गेम चेंजर ठरत असतानाच कोल्हापुरचे भाजपचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी शनिवारी (९ नोव्हेंबर) एका प्रचारसभेत, ज्या बहिणी योजनेचे १५०० रुपये घेऊन काँग्रेसच्या प्रचारफेरीत जातील, त्यांचे फोटो आणा. त्यांची व्यवस्था करतो, असा दम दिला होता. यानंतर आता टीकेची झोड उठली आहे. यानंतर महाडिक यांनी दिलगिरी व्यक्त करताना पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांनी व्होट जिहाद करणाऱ्या महिला, असा शब्द वापरल्याने पुन्हा एकदा वाद उफाळला आहे.

काँग्रेस नेत्यांचा हल्लाबोल

महाडिक यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील यांनी, धनंजय महाडिक यांची मुजोरी असल्यानेत ते असे बोलत आहेत. त्यांची पार्श्वभूमी गुंडगिरीची असल्यामुळेच ते असली भाषा करत आहेत. असे वक्तव्य म्हणजे माता भगिनींचा अपमान केल्याचा प्रकार आहे. यामुळे महाडिकांनी राज्यातील महिलांची माफी मागावी, असा हल्लाबोल केला.

महिलांचा अपमान करण्याचे महाडिकांचे धाडस होते कसे? असा सवाल खासदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे. यावेळी त्यांनी, आमचे बिनधास्त फोटो काढा. महाराष्ट्राच्या लेकी कुणाला घाबरत नाहीत, असे आवाहन महाडिक यांना देताना, महायुतीने लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना लाच दिली आहे का? आम्हाला स्वाभिमान पाहिजे, आधार, सन्मान आणि सुरक्षितता पाहिजे. महिलांचा अवमान करणार्‍या महाडिक यांनी संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागावी, असेही खासदार शिंदे यांनी म्हटले आहे.

धनंजय महाडिकांचा माफीनामा

दरम्यान, या वक्तव्यानंतर राज्यभर टीकेची झोड उठल्यानंतर महाडिकांनी समाजमाध्यम एक्सवर पोस्ट करत माफी मागितली आहे. त्यांनी, माझ्या वक्तव्याने कुठल्याही माता भगिनींचे मन दुखावले असेल तर त्यांची मी बिनशर्त माफी मागतो. माता भगिनीचा अपमान करण्याचा मुळीच उद्देश नव्हता. पण निवडणूक काळात राजकीय प्रचार करताना विरोधी पक्षाच्या खोट्या प्रचाराला बळी पडणाऱ्या महिलांनासाठी होता. लाडकी बहीण योजना ही फक्त महायुती सरकारमुळेच यशस्वी झाली आहे. मात्र काही विशेषतः व्होट जिहाद करणाऱ्या महिलांच्या प्रती आलेली स्वाभाविक प्रतिक्रिया मी व्यक्त केली, असेही महाडिक यांनी म्हटले आहे. आता व्होट जिहाद या शब्दावरून राजकीय वादंग सुरू झाले आहे.

त्यामुळे महिला दुर्लक्ष करत आहेत : राऊत

दरम्यान याच मुद्द्यानरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील जोरदार टीका केली आहे. राऊत यांनी, १५०० रूपये दिले म्हणजे मतं विकत घेतलात का? सरकार कुणाच्या बापाचं नाही, ते जनतेचे असते. यामुळे असे वक्तव्य करणाऱ्या महाडिकांनी विसरू नये. तुम्ही कोणत्या पक्षातून कोणत्या पक्षात गेलात? किती पक्ष बदललेत हे विसरलात का? योजनेचे पैसे नरेंद्र मोदी, अमित शाह, एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या घरातून पैसे येत नाहीत. यांनी त्यांच्या जमिनी विकून पैसे दिलेले नाहीत. ते आमच्या करातून आलेले आहेत. यामुळे निवडणूक काळात महिलांना अशा धमक्या दिल्या जात आहेत. राज्यातील महिलांनाही माहिती आहे की हा तीन महिन्यांचा खेळ आहे, त्यामुळे महिला दुर्लक्ष करत आहेत असा टोला राऊत यांनी लगावला आहे.

काय म्हणाले होते महाडीक ?

खासदार धनंजय महाडिक आपले बंधू तथा भाजपचे कोल्हापूर दक्षिणचे उमेदवार अमल महाडिक यांच्या प्रचार सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षाची रॅली निघाली आणि त्यामध्ये जर तुम्हाला 'लाडकी बहीण योजने'चे पैसे घेतलेल्या महिला दिसल्या तर त्यांचे फोटो काढा. त्यांची नावे लिहून घ्या, घ्यायचं आपल्या शासनाचं आणि गायचं त्याचं. हे चालणार नाही. एकीकडे छाती बडवत आम्हाला पैसे नकोत, आम्हाला सुरक्षा पाहिजे असं म्हणायचं. तर दुसरीकडे पैशांचं राजकारण करायचं? हे कसं चालेल. त्यामुळे काँग्रेसच्या रॅलीमध्ये दिसणाऱ्या अशा महिलांचे फोटो आणि नावे आणा. आम्ही त्यांची व्यवस्था करतो. आमच्याकडेही पैसे जास्त झाले नाहीत, असे वक्तव्य खासदार धनंजय महाडिक यांनी केले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Temperature Rise Problem : तापमानवाढ नियंत्रणासाठी कधी एकत्र येणार?

Pimpalgaon Joge Canal : पिंपळगाव जोगे धरणाच्या कालव्याची दुरवस्था

Sharad Pawar : राज्यात कोणी दाब दडपशाही करत असेल तर ते खपवून घेणार नाही : शरद पवार

Cotton Market : बारामती बाजार समितीत शनिवारपासून कापूस विक्री

Devendra Fadnavis : आमचे सरकार आले तर पूर्ण कर्जमाफी देणार : फडणवीस

SCROLL FOR NEXT