Ethanol Production Agrowon
ॲग्रो विशेष

Ethanol Production : खराब धान्य, मक्यापासून तयार इथेनॉलला तेल कंपन्यांकडून जादा दर शक्य

Biofuels Production : खराब धान्य व मक्यासाठी सरासरी ३ ते ४ रुपयांपर्यंतची वाढ अपेक्षित आहे. येत्या काही दिवसांत वाढीव दर इथेनॉल प्रकल्पांना मिळू शकतो, असा अंदाज आहे.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News : खराब धान्य व मक्यापासून तयार होणाऱ्या इथेनॉलला तेल उत्पादक कंपन्यांकडून जादा प्रोत्साहनात्मक रक्कम मिळण्याची शक्यता आहे. खराब धान्य व मक्यासाठी सरासरी ३ ते ४ रुपयांपर्यंतची वाढ अपेक्षित आहे.

येत्या काही दिवसांत वाढीव दर इथेनॉल प्रकल्पांना मिळू शकतो, असा अंदाज आहे. साखर उद्योगाव्यतिरिक्त इतर धान्यांपासून इथेनॉल निर्मितीसाठी केंद्राने प्रयत्न सुरू केले आहेत. सध्‍या ८० टक्के इथेनॉल हे साखर उद्योगातून तर २० टक्के इथेनॉल हे खराब धान्य व मक्यापासून तयार होते.

सध्या इथेनॉल प्रकल्‍पांना भारतीय अन्‍न महामंडळाकडून (एफसीआय) तांदळाचा पुरवठा होत नसल्‍याची स्‍थिती आहे. यामुळे तांदळावर आधारित इथेनॉल प्रकल्प अडचणीत आहेत. या प्रकल्पांना संजीवनी देण्याबाबत काय करता येईल याबाबत अद्याप केंद्र सरकारला समाधानकारक उत्तर सापडले नाही. यामुळे नजीकच्या काळात हे प्रकल्प सुरू ठेवण्यासाठी मदत करण्याचे आव्हान केंद्रापुढे असेल. मक्याची उपलब्धताही फारशी नाही.

साखर उद्योगाला पर्याय ठरणाऱ्या अन्‍नधान्यापासून इथेनॉलनिर्मिती मंदावली आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेझ रिसर्चने मका लागवडीला गती देण्‍याची आवश्‍यकता असल्याचे म्हटले आहे. या पार्श्‍वभूमीवर तेल कंपन्या साखर उद्योगाव्यतिरिक्त अन्‍य धान्यांपासून तयार होणाऱ्या इथेनॉलला जादा दर देण्याच्या विचारापर्यंत आल्या आहेत.

केंद्राने कोणत्याही परिस्थितीत इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. नवीन प्रकल्पांना परवानगी देण्यासाठी सुलभता आणली आहे. केंद्राच्या धोरणांमुळे तेल कंपन्यांना आवश्‍यक इतक्या इथेनॉलची खरेदी करणे क्रमप्राप्‍त झाले आहे.

प्रकल्पांना वाढीव दराचा फायदा

तेल कंपन्यांनी ‍ऑगस्टच्या पहिल्या सप्‍ताहात खराब किंवा तुटलेल्या तांदळापासून उत्पादित इथेनॉलची खरेदी किंमत ४.७५ प्रति लिटरने वाढवून ६०.२९ प्रति लिटर केली आहे. याशिवाय मक्यापासून उत्पादित इथेनॉलची किंमत प्रतिलिटर ६.०१ रुपयांनी वाढवून ६२.३६ रुपये केली आहे. यानंतरही कंपन्यांनी रक्कम आणखी वाढविण्याचा विचार सुरू केला आहे.

उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, छत्तीसगड आणि ओडिशा हे प्रमुख तांदूळ उत्पादक आहेत. मध्य प्रदेश आणि बिहार हे मुख्यतः मक्यासाठी ओळखले जातात. या राज्यांत या पिकावर असणाऱ्या प्रकल्पांना वाढीव दराचा फायदा होऊ शकेल, असा अंदाज आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Rain Forecast: गुरुवारपासून पावसाला सुरुवात होणार; राज्यात आज आणि उद्या पावसाची उघडीप राहण्याची शक्यता

Nepal Youth Protests: नेपाळ संसदेला घेराव, राष्ट्रपती भवनावर कब्जा; पंतप्रधान ओलींनी दिला राजीनामा

PM Kisan Maandhan Scheme: वृद्धापकाळात शेतकऱ्यांना मिळणार मासिक ३ हजार रुपये पेन्शन; केंद्र सरकारची आर्थिक आधार देणारी योजना!

Papaya Cultivation : पपईत पाणी निघत असल्याने चिंतेत भर

Sericulture : सोलापूर जिल्ह्यात रेशीम विभागाचे ‘रेशीम आपल्या दारी’ अभियान

SCROLL FOR NEXT