Ramdas Athawale  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Land : भूमिहिनांना जमिनी देण्यासाठी शासकीय समिती स्थापन करा

Ramdas Athawale : भूमिहिनांना पाच एकरापर्यंत जमिनी द्याव्यात, अशी आमची वर्षानुवर्षे मागणी आहे.

 गोपाल हागे

Akola News : भूमिहिनांना पाच एकरापर्यंत जमिनी द्याव्यात, अशी आमची वर्षानुवर्षे मागणी आहे. शासनाने ही बाब विचारात घेत एका शासकीय समितीची स्थापना करावी. यासाठी आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मागणी करणार आहोत, अशी माहिती रिपाईचे नेते, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली.

पक्षाच्या मेळाव्यासाठी अकोला दौऱ्यावर आले असता त्यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. आज बरीच जमीन पडीक आहे. या जमिनी राज्यातील भूमिहिनांना देण्यासाठी सातत्याने मागणी होत आहे.

पक्षाचीही ही मागणी आहे. या जमिनी वहिती झाल्या तर शहरांकडे येणारे लोंढे थांबतील. झोपडपट्ट्या वाढणार नाहीत. स्थानिक पातळीवर हातांना काम मिळेल, असेही ते म्हणाले.

राज्यात ४५ जागा जिंकणार

आगामी लोकसभा निवडणुकीत महायुती ४८ पैकी किमान ४५ जागांवर जिंकेल असा दावाही आठवले यांनी पत्रकार परिषदेत केला. राज्यात दोन जागा रिपाईला मिळण्यासाठी आपण अमित शाह, जे. पी. नड्‍डा यांची लवकरच भेट घेणार आहोत. देशात एनडीएला विरोध करण्यासाठी विरोधक एकवटले आहेत.

मात्र, मोदींच्या नेतृत्वात देशभरात विकास होत आहे. आज रस्त्यांचे जाळे नितीन गडकरींनी उभे केले. ५० कोटी जनधन बँक खाती उघडण्यात आली. पंतप्रधान आवास योजनेतून देशात चार कोटी नागरिकांना घरे मिळाली आहेत. अशा अनेक योजनांचे लाभ सामान्यांपर्यंत पोचले. मोदी हे स्वतः सामान्यांच्या विकासासाठी अग्रेसर नेतृत्व आहे.

देशात त्यांच्या नेतृत्वात किमान ४०० जागा जिंकल्या जातील, असेही ते म्हणाले. काँग्रेसने आजवर दलितांची फक्त मते वापरली, अशी टीकाही त्यांनी केली. विदर्भाच्या मुद्यावर बोलताना त्यांनी या भागाचा विकास व्हायला हवा. शासनाने विदर्भातील रखडलेले प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी पाठबळ दिले पाहिजे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agripreneurship MOU: कृषी विद्यापीठ, सह्याद्री फार्म्समध्ये करार

Jalalakshmi Irrigation Scheme: जललक्ष्मी प्रवाही योजनेचा २३ गावांतील शेतीला लाभ

Tiger Attack Compensation: सोनवणे कुटुंबाला १० लाखांचा धनादेश

Solapur Development Projects: वारी, कॉरिडॉर, आयटी पार्कला ‘टॉप प्रायोरिटी’

Sugarcane Payments Pending: उसाचे पेमेंट न मिळाल्याने शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण

SCROLL FOR NEXT