Agriculture Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Advisory: कृषी सल्ला : कोकण विभाग

Agriculture Tips: कोकणातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा कृषी सल्ला! हळदीच्या काढणीपासून वाळवण्यापर्यंतची काळजी, वांगी व मिरची पिकांसाठी खत व्यवस्थापन आणि तुडतुडे-मावा नियंत्रण, तसेच कलिंगड पिकाच्या योग्य काढणीसाठी आवश्यक तंत्रांचा आढावा या मार्गदर्शनातून मिळवा.

Team Agrowon

Crop Management in Kokan:

हळद

पक्व हळद पिकाची काढणी करावी. कंद व हळकुंडे वेगवेगळी करून हळद शिजवून ताडपत्रीवर सिमेंट काँक्रीटच्या खळ्यावर वाळविण्यासाठी पसरून ठेवावी. हळद वाळविण्यासाठी १० ते १५ दिवस लागतो.

वांगी, मिरची

वांगी पिकास नत्र खताची तिसरी मात्रा ४ ग्रॅम युरिया प्रति रोप पुनर्लागवडीनंतर दोन महिन्यांनी द्यावी. मिरची पिकाला फळधारणेच्या वेळी नत्र खताची तिसरी मात्रा ३ ग्रॅम युरिया देण्यात यावी.

वांगी, मिरची, टोमॅटो पिकावर तुडतुडे व मावा किडींचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता आहे. प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्वरित नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात. रसशोषक किडींच्या व्यवस्थापनासाठी पिकामध्ये पिवळे चिकट कागदाचे सापळे प्रति गुंठा १ सापळा या प्रमाणे लावावेत.

कलिंगड

फळधारणा अवस्थेत असलेल्या कलिंगड पिकाला ३ ते ४ दिवसांच्या अंतराने नियमित पाणी द्यावे.

कलिंगडाच्या फळांचे सूर्यप्रकाशापासून बचाव करण्यासाठी फळे भाताच्या पेंढ्याने किंवा गवताने झाकून घ्यावीत. काढणीपूर्वी कलिंगड पिकास ६ ते ७ दिवस आधी पाणी बंद करावे.

कलिंगड हे फळ काढणीस तयार झाले की नाही हे ओळखण्यासाठी फळावर टिचकी मारावी. टिचकी मारल्यास तयार फळांचा ‘टण... टण’ असा आवाज येतो. तयार फळांचा जमिनीलगतचा रंग पिवळसर होतो. तयार फळांच्या देठाजवळील लतातंतू सुकलेले असतात. अशा फळांची काढणी करावी.

- डॉ. विजय मोरे, ९४२२३७४००१

(नोडल अधिकारी, कृषी विद्या विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आणि ग्रामीण कृषी मौसम सेवा योजना, दापोली)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT